Maruti Cars: मारुती सुझुकीने मागील वर्षीच नेक्सा प्लॅटफॉर्म अंतर्गत विकल्या गेलेल्या सर्व कार ब्लॅक एडिशनमध्ये सादर केल्या आहेत. आता कंपनी आपल्या एरिना लाइनअपच्या सर्व कार ब्लॅक एडिशनमध्ये सादर करणार आहे. म्हणजेच Alto 800 आणि Eeco वगळता मारुती आपल्या देशांतर्गत बाजारात उपस्थित असलेल्या सर्व कार ब्लॅक एडिशनमध्ये सादर करेल.


Maruti Cars Black Edition: ब्लॅक एडिशन टॉप व्हेरियंट कारमध्ये समाविष्ट केले जाऊ शकते


कंपनी हे ब्लॅक एडिशन टॉप ट्रिममध्ये देऊ शकते. व्हेरिएंटचे तपशील कंपनीने शेअर केलेले नाहीत. म्हणजेच कंपनीच्या ब्लॅक एडिशन कार फक्त काळ्या पेंटसह सादर केल्या जातील, याशिवाय वाहनांमध्ये कोणताही बदल होणार नाही.


Maruti Cars Black Edition: या गाड्यांचा असेल समावेश 


मारुती अरेनाच्या ब्लॅक एडिशन मॉडेलमध्ये Wagon-R, Alto K10, S-Presso, Ertiga, Brezza, Dzire, Swift आणि Celerio गाड्यांचा समावेश असेल. तर मारुतीच्या Alto 800 आणि Eeco या गाड्यांचा त्यात समावेश नसेल.


Maruti Cars Black Edition: खरेदीवर कोणतेही अतिरिक्त शुल्क लागणार नाही


मारुतीच्या नेक्सा कारच्या ब्लॅक एडिशनप्रमाणे कंपनी एरिना ब्लॅक एडिशन कार खरेदी करण्यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारणार नाही. हा रंग जास्त उष्णता शोषून घेतो, अशुभ आहे, अशा काही तर्काने देशातील कार उत्पादक बऱ्याच काळापासून त्यांच्या कारला काळा रंग देण्याचे टाळत आहेत. दरम्यान, स्पेशल ब्लॅक एडिशनला आता खूप पसंती दिली जात आहे. ज्यामुळे इतर कार उत्पादकांना त्यांच्या कार ब्लॅक एडिशनमध्ये सादर करण्यास सुरुवात केली आहे.


Tata Dark Red Edition Cars 


दरम्यान, टाटा मोटर्सने त्यांच्या तीन लोकप्रिय एसयूव्ही नेक्सन , हॅरियर आणि सफारी या वाहनांचे डार्क एडिशन (Dark Edition) लॉन्च केले होते. कंपनीने या तिन्ही एसयूव्हीमध्ये असे फीचर्स दिले आहेत, जे याला नियमित व्हर्जनपेक्षा वेगळे बनवते. याच्या Tata Harrier आणि Safari Dark Edition मध्ये काही नवीन फीचर्स पाहायला मिळतील. यामध्ये 6 भाषांमध्ये 200 हून अधिक व्हॉईस कमांडसह 6 वे पॉवर्ड ड्रायव्हर सीट, मेमरी आणि वेलकम फंक्शन, 26.03 सेमी हरमन टचस्क्रीन इन्फोटेनमेंट, 17.78 सेमी डिजिटल TFT इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, 360 सराउंड व्ह्यू सिस्टीम आणि अॅडव्हान्स सेफ्टीसाठी ADAS सारखे फीचर्स देण्यात आले आहे. याव्यतिरिक्त सफारीमध्ये इलेक्ट्रिक बॉस मोडसह 4-वे पॉवर चालणारी को-ड्रायव्हर सीट आणि मूड लाइटिंगसह भव्य सनरूफ यासारखे फीचर्स देखील आहेत.


या कारशी होणार स्पर्धा 


मारुतीच्या गाड्यांना देशांतर्गत बाजारपेठेत टक्कर देण्यासाठी ह्युंदाई, टाटा, टोयोटा यासह अनेक प्रतिस्पर्धी कंपन्या आहेत आणि आता किआही मजबूत प्रतिस्पर्धी म्हणून समोर आली आहे.


Car loan Information:

Calculate Car Loan EMI