Hyundai Ai3: दक्षिण कोरियाची वाहन उत्पादक कंपनी ह्युंदाई मोटर आपली आगामी नवीन मायक्रो एसयूव्ही कोडनेम Ai3 ची टेस्ट करत आहे. जी अनेक वेळा पाहिली गेली आहे. ही कार पुढील महिन्यात देशात येणाऱ्या टाटा पंच आणि मारुती फ्रँक्सशी स्पर्धा करेल. ही कार जागतिक बाजारात विकल्या जाणाऱ्या Hyundai च्या Casper सारखी असू शकते, पण तिची लांबी जास्त असेल. याची लांबी 3595 मिमी, रुंदी 1595 मिमी आणि उंची 1575 मिमी-1605 मिमी आणि व्हीलबेस 2400 मिमी असेल. याच कारबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ..
Hyundai Ai3: डिझाइन
नवीन स्पाय फोटोमध्ये दिसत असलेल्या प्रमाणे या मायक्रो एसयूव्हीला सनरूफ देखील मिळेल, जे टॉप व्हेरियंटमध्ये दिले जाऊ शकते. याच्या पुढील बाजूस सिग्नेचर ग्रिल, प्रोजेक्टर हेडलाइट्स आणि एच-शेप लाइट एलिमेंटसह टेललॅम्प, वर्तुळाकार फॉग लॅम्प, एलईडी डीआरएल आणि अलॉय व्हील्स दिसतील. मात्र याच्या इंटीरियरचा तपशील अद्याप समोर आलेला नाही.
Hyundai Ai3: मिळणार हे फीचर्स
या कारच्या फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, Grand i10 Nios चे अनेक फीचर्स यामध्ये पाहायला मिळतात. यात अॅपल कार प्ले आणि अँड्रॉइड ऑटो कनेक्टिव्हिटी, वायरलेस चार्जर, सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, कनेक्टेड कार टेक, रिअर एसी व्हेंट्स, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल आणि इतर अनेक फीचर्ससह टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम मिळू शकते.
Hyundai Ai3: इंजिन कसे असेल?
कंपनीने या कारच्या पॉवरट्रेनबद्दल काहीही खुलासा केलेला नाही, परंतु काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, यामध्ये Grand i10 Nios सारखे 1.2L पेट्रोल इंजिन मिळू शकते. जे 83bhp पॉवर आणि 113.8Nm टॉर्क जनरेट करू शकते. या मिनी एसयूव्हीमध्ये मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्स असे दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत. तसेच यामध्ये सीएनजीचा पर्यायही दिला जाऊ शकतो.
Hyundai Ai3: किती असेल किंमत?
नवीन Hyundai micro SUV ची प्रारंभिक किंमत सुमारे 6 लाख रुपये असू शकते. तर याच्या टॉप मॉडेलची किंमत सुमारे 10 लाख रुपये असू शकते. ही कार यावर्षी फेस्टिव्ह सीझनमध्ये लॉन्च केली जाऊ शकते.
टाटा पंचशी करेल स्पर्धा
Tata Punch ला 1199 cc BS6 पेट्रोल इंजिन मिळते, जे 86PS/117 Nm चे आउटपुट जनरेट करते. याची एक्स-शोरूम किंमत 6 लाख रुपयांपासून सुरू होते.
इतर ऑटो सेगमेंट संबंधित बातमी:
Car loan Information:
Calculate Car Loan EMI