Mahindra XUV400 Electric Sets New Record: प्रसिद्ध वाहन उत्पदक कंपनी महिंद्राचे वाहन भारतात खूप पसंत केले जातात. कंपनीचे कोणतेही वाहन बाजारात लॉन्च होताच, ते बेस्ट सेलर बनतात. या सिरीजमध्ये महिंद्रा XUV400 चे इलेक्ट्रिक व्हर्जन लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. कंपनीने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये या कारचे अनावरण केले होते. तर या महिन्यात कंपनी याची किंमती जाहीर करू शकते.


Mahindra XUV400 Electric Sets New Record: शून्य तापमानात 751 किलोमीटरचे अंतर कापले 


XUV400 चे बेस-स्पेक व्हेरिएंट सुमारे 17 लाख रुपये किंवा त्याहूनही कमी किंमतीत ऑफर केले जाऊ शकते. XUV400 ची तांत्रिक फीचर्स, रेंज, बॅटरी क्षमता आणि आकारमान इत्यादींच्या बाबतीत Nexon EV पेक्षा चांगली आहेत. कंपनीने दावा केला आहे की, Mahindra XUV400 Electric ने नवा रेकॉर्ड बनवला आहे. 24 तासांच्या आत शून्य तापमानात 751 किलोमीटरचे अंतर कापणारे ही पहिले इलेक्ट्रिक कार ठरली आहे. या कारने हिमाचल प्रदेशमधील लाहौर-स्पीटी भागातील केयलाँग मार्गे 751 किलोमीटरचे अंतर 24 तासांत कापले आहे.






XUV400 112 Ah च्या रेटिंगसह 39.4 kWh बॅटरी पॅकद्वारे समर्थित आहे. बॅटरी पॅकमध्ये एनएमसी (निकेल, मॅंगनीज आणि कोबाल्ट) इलेक्ट्रो-केमिकल डिझाइन आहे. वाहनाचे वजन 1,960 किलोग्रॅम आहे, बॅटरी पॅकचे वजन 309 किलो आहे. अधिकृतपणे, XUV400 8.3 सेकंदात 0-100 किमी प्रतितास वेग गाठू शकते. यामुळे लक्झरी सेगमेंट वगळता भारतात उत्पादित होणारे हे सर्वात वेगवान प्रवासी वाहन बनणार आहे. XUV400 चा टॉप स्पीड 150 kmph आहे. XUV400 ची लांबी 4,200 मिमी, रुंदी 1,821 मिमी, उंची 1,634 मिमी आणि 2,600 मिमी चा व्हीलबेस आहे. जे XUV300 पेक्षा जास्त आहे, जरी दोन्ही SUV एकाच प्लॅटफॉर्मवर आधारित आहेत. Mahindra XUV400 मध्ये AC - सिंक्रोनस मोटर आहे. जी 5,500 rpm वर 110 kW (147.5 hp) पॉवर आणि 310 Nm पीक टॉर्क जनरेट करते.


Car loan Information:

Calculate Car Loan EMI