Auto Expo 2023: इलेक्ट्रिक वाहन उत्पादक स्टार्टअप कंपनी टॉर्क मोटर्स ऑटो एक्सपोमध्ये आपल्या बाईकचे अपडेटेड व्हेरिएंट सादर करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कंपनी आपल्या टॉर्क Kratos R च्या डिझाइनमध्ये बदल करून फास्ट चार्जिंग तंत्रज्ञानासह सादर करू शकते. या बाईकमध्ये आणखी काय विशेष मिळू शकतं, याबाबत अधिक माहिती जाणून घेऊ. तसेच या बाईकची किंमत किती असू शकते, याबाबतही माहिती अजनून घेऊ..
लूक
टॉर्क क्रॅटोस आर इलेक्ट्रिक बाईकचे डिझाइन अपडेट करून, कंपनी स्प्लिट ट्रेलीस फ्रेमवर ती तयार करू शकते. यामुळे त्याचा लूक पूर्वीपेक्षा अधिक स्पोर्टी दिसेल. वॉटरप्रूफ अॅल्युमिनियम-सील, स्टेप-अप सीट्स आणि ऑल-एलईडी लाइटिंग सेटअपमधील बॅटरी पॅक व्यतिरिक्त, ब्लूटूथ स्मार्टफोन कनेक्टिव्हिटीसह डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर पाहण्यास मिळेल.
ही इलेक्ट्रिक बाईक 4 kWh बॅटरी पॅकसह 9kW इलेक्ट्रिक मोटरद्वारे चालविली जाईल. जे 12 एचपी पॉवर आणि 38 एनएम टॉर्क देण्यास सक्षम असेल. याचा टॉप स्पीड 105 किमी प्रतितास इतका असू शकतो. या बाईकमध्ये फास्ट चार्जिंग तंत्रज्ञान देखील पाहायला मिळते, ज्यामुळे बाईक एका तासात 80 टक्के चार्ज होऊ शकते.
फीचर्स
अॅलर्ट टोन, फाइंड माय व्हेईकल, जिओ-फेन्सिंग, मोटर वॉक असिस्ट, ट्रॅक मोड, ट्रॅक अॅनालिटिक्स, स्मार्ट चार्ज अॅनालिसिस यासारखी अॅडव्हान्स फीचर्स या बाईकमध्ये पाहायला मिळू शकतात. सस्पेन्शनबद्दल बोलायचे झाले तर, बाईक पुढच्या बाजूला इनव्हर्टेड फॉर्क्स आणि मागच्या बाजूला मोनोशॉक युनिट वापरू शकते.
किंमत
या बाईकच्या किंमतीबाबत कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नाही. परंतु या इलेक्ट्रिक बाईकची किंमत तिच्या सध्याच्या 1.37 लाख रुपयांच्या (एक्स-शोरूम) किंमतीपेक्षा जास्त असेल. दरम्यान, टॉर्की क्रॅटोस आर बाईकशी स्पर्धा करण्यासाठी काही पर्याय आधीच उपलब्ध आहेत. ज्यामध्ये Revolt RV400 इलेक्ट्रिक बाईक, Oberon Rohrer इलेक्ट्रिक बाईक, Kabira Mobility आणि Earth Energy EV Evolve R सारख्या बाईक्स आहेत.
LML स्टार इलेक्ट्रिक स्कूटर
टू व्हीलर उत्पादक कंपनी LML या महिन्यात होणाऱ्या लाइव्ह ऑटो एक्सपोमध्ये आपले दोन नवीन इलेक्ट्रिक प्रदर्शित करेल. ज्यामध्ये LML स्टार इलेक्ट्रिक स्कूटर असेल. त्याच्या पुनरागमनाच्या निमित्ताने, कंपनीने ओरियन, मूनशॉट आणि स्टार सारख्या तीन इलेक्ट्रिक स्कूटर सादर केल्या आहेत. स्टार इलेक्ट्रिक स्कूटर जी MML प्रदर्शित करेल, ते त्याच्या पुनरागमनानंतर ब्रँडचे पहिले उत्पादन असेल. जे या वर्षी लॉन्च होण्याची शक्यता आहे.
Car loan Information:
Calculate Car Loan EMI