5 Door Mahindra Thar : दिग्गज कार वाहक निर्माता कंपनी महिंद्रा अॅन्ड महिंद्रा (Mahindra & Mahindra) ग्राहकांसाठी नेहमीच वेगवेगळ्या अपडेटेड कार घेऊन येत असते. नवीन वर्ष सुरु व्हायला अवघे काहीच दिवस आहेत, आणि नवीन वर्षात महिंद्रा कंपनी ग्राहकांसाठी नवीन कार लॉन्च करणार आहे. महिंद्रा कंपनी जानेवारीत होणाऱ्या ऑटो एक्सपो 2023 मध्ये सहभागी नाही होणार. मात्र, कंपनी 26 जानेवारीला म्हणजेच प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आपली 5 डोअर महिंद्रा थार कार सादर करणार आहे. मात्र, कार लॉन्चच्या तारखे संदर्भात अद्याप कोणतीही घोषणा करण्यात आली नाही. तरी, या कारची विक्री पुढच्या वर्षीच्या उत्तरार्धात होण्याची शक्यता आहे. 


इंजिन कसे असेल?


नवीन 5-डोअर महिंद्रा थार मध्ये 5-डोअर महिंद्रा थार 2.2L mHawk डिझेल आणि 2.0L mStallion पेट्रोल इंजिन वापरण्यात येणार आहे. जे सध्याच्या 3-डोअर व्हर्जनवर ऑफर केले जाते. मात्र, या दोन्ही इंजिनला जास्त पॉवर आणि टॉर्कसाठी रिट्यून केले जाऊ शकते. यात मॅन्युअल किंवा ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचा पर्याय मिळेल. नवीन थारमध्ये मानक 4X4 प्रणालीसह 4X2 ड्राइव्हट्रेनचा पर्याय देखील मिळू शकतो.  


महिंद्रा थार 5-डोअर त्याच्या सध्याच्या 3-डोअर व्हर्जनपेक्षा 15 टक्के लांब असेल. या कारची लांबी 3,985 मिमी आहे. यात 6 आणि 7-सीट कॉन्फिगरेशनचा पर्याय मिळू शकतो. नवीन महिंद्र थारचे आतील लेआउट आणि वैशिष्ट्ये 3-डोअरच्या व्हर्जन प्रमाणेच असण्याची अपेक्षा आहे.


कारचा खर्च किती असेल?


महिंद्रा थारची 3-डोअर व्हर्जन सध्या 13.59 लाख ते 16.29 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किंमतीत उपलब्ध आहे. या कारच्या नवीन मॉडेलची किंमत सुमारे 90,000 ते 1 लाख रुपयांपर्यंत असण्याची शक्यता आहे. 


ही कार कोणाशी स्पर्धा करणार?


भारतात, 5-डोअर थार आगामी 5-डोअरची मारुती जिमनी आणि फोर्स गुरखा यांच्याशी स्पर्धा करणार आहे. मारुतीच्या नवीन 5 डोअर जिमनीमध्ये 1.5 L, K15B पेट्रोल इंजिन मिळेल. ही कार खास ऑफ रोडिंगसाठी तयार करण्यात आली आहे. जानेवारीमध्ये होणाऱ्या ऑटो एक्स्पोमध्ये ती सादर करण्यात येणार आहे.


महत्त्वाच्या बातम्या : 


Upcoming Electric Bike: जबरदस्त पॉवर रेंजसह होंडाची इलेक्ट्रिक बाईक लवकरच होणार लॉन्च, मिळणार जबरदस्त फीचर्स


Car loan Information:

Calculate Car Loan EMI