Honda Electric Bike: पेट्रोल आणि डिझेलच्या सतत वाढत असलेल्या किंमतींना कंटाळून लोक आता इलेक्ट्रिक वाहनांकडे वळताना दिसत आहेत. यामुळेच वाहन उत्पादक त्यांच्या इलेक्ट्रिक सेगमेंटवर अधिक लक्ष केंद्रित करत आहेत. यातच नवीन वर्षात होंडा आपली नवीन इलेक्ट्रिक बाईक सादर करणार आहे. नुकतेच कंपनीने या बाईकचे स्केच जारी केले आहे. या बाईकमध्ये कंपनी कोणते फीचर्स देऊ शकते, तसेच कशी असेल ही बाईक, याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ...


Honda Electric Bike: इलेक्ट्रिक बाईक डिझाइन


या Honda इलेक्ट्रिक बाईकची डिझाइन नुकतीच सादर करण्यात आलेल्या CB750 Hornet सारखी असेल. ज्यामध्ये मस्क्युलर टँक, मोठे हँडलबार, स्प्लिट-टाइप सीट्स, अँगुलर हेडलाइट, स्लिम टेल सेक्शन आणि स्लीक टेललॅम्प्स हाय-परफॉर्मन्स एलईडी लाइटिंगसह दिसू शकतात.


Honda Electric Bike: किती मिळेल रेंज?


या इलेक्ट्रिक बाईकच्या पॉवर रेंजबद्दल कोणतीही अधिकृत माहिती अद्याप उपलब्ध झाली. पण अंदाजानुसार, यात पीएमएस इलेक्ट्रिक मोटरसह फास्ट चार्जिंग तंत्रज्ञान दिले जाऊ शकते. तसेच याची रेंज एका चार्जवर 200 किमी पर्यंत असू शकते.


Honda Electric Bike: फीचर्स 


राइडिंगचा चांगला असावा यासाठी बाईकला दोन्ही चाकांवर डिस्क ब्रेक (समोर आणि मागे), ड्युअल चॅनल अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टीम (ABS), रीजनरेटिव्ह ब्रेकिंग सिस्टीम आणि रायडिंग मोडसह सेफ्टी नेट जोडले जाऊ शकतात. याच्या सस्पेन्शनबद्दल सांगायचे तर, बाईकला पुढच्या बाजूला Inverted Forks आणि मागच्या बाजूला मोनो-शॉक युनिट दिले जाऊ शकते.


Honda Electric Bike: इलेक्ट्रिक बाईकची किंमत


सध्या तरी या बाईकच्या किंमतीबद्दल कोणतीही माहिती उपलब्ध नाही. पण अंदाजानुसार याची किंमत 3 ते 5 लाख रुपयांदरम्यान, असण्याची शक्यता आहे. दरम्यान, जर आपण या इलेक्ट्रिक बाईकच्या पर्यायाबद्दल बोललो, तर ओबेन रोअर (Oben Rorr), जॉय ई-बाईक मॉन्स्टर, रिव्हॉल्ट RV400, कोमाकी रेंजर सारख्या इलेक्ट्रिक बाईक्स आधीच बाजारात उपलब्ध आहेत. या बाईक होंडाच्या बाईकला टक्कर देतील.


इतर महत्वाच्या बातम्या: 


Mercedes Benz Vision EQXX: मुंबई ते नागपूर एका चार्जमध्ये गाठणार; 'या' इलेक्ट्रिक कारसमोर सगळ्या आहेत फेल; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स


 



 



Car loan Information:

Calculate Car Loan EMI