AMO's electric scooter: महागलेल्या पेट्रोलला पर्याय म्हणून आता इलेक्ट्रिक गाड्या तसंच स्कूटर बाजारत येत आहेत. याच पार्श्वभूमीवीर एएमओ इलेक्ट्रिक बाइक्स या इलेक्ट्रिक मोबिलिटी ब्रॅण्डने इलेक्ट्रिक स्कूटर जॉण्टी प्लस लाँच केली आहे. ही ई-बाइक सरासरी 120 किलोमीटरहून अधिक अंतर पार करु शकते, असा दावा कंपनीने केला आहे. दरम्यान या गाडीला संपूर्ण चार्ज होण्यासाठी केवळ चार तासांचा अवधी लागतो, असंही कंपनीकडून कळवण्यात येत आहे.
आधुनिक स्टाईल
एर्गोनॉमिक डिझाइन, स्टाइल आणि वैशिष्ट्यांच्या परिपूर्ण संयोजनासह डिझाइन करण्यात आलेल्या जॉण्टी प्लसमध्ये 60 व्होल्ट / 40 एएच प्रगत लिथियम बॅटरी आहे. जॉण्टी प्लस ही सरासरी 120 किमीहून अधिक अंतराची रेंज देते. ब्रशलेस डीसी मोटरसह फास्ट चार्जिंग असलेली ही ई-बाइक अधिकतम चार तासांमध्ये पूर्णपणे चार्ज होते. सुरक्षितता आणि स्टाइलसह जॉण्टी प्लसमध्ये मोबाइल यूएसबी चार्जिंग पोर्ट देखील आहे. यामध्ये फिक्स्ड आणि पोर्टेबल बॅटरी पॅक पर्याय असेल.
किंमत काय?
नवीनच लाँच करण्यात आलेली ई-बाइक तीन वर्षांच्या वॉरंटीसह येते आणि रेड-ब्लॅक, ग्रे-ब्लॅक, ब्ल्यू- ब्लॅक, व्हाइट-ब्लॅक आणि येलो-ब्लॅक या पाच आकर्षक रंगांच्या व्हेरिएंट मध्ये उपलब्ध आहे. या ई-बाइकची किंमत 1 लाख 10 हजार 460 रूपये (एक्स-शोरूम) आहे. ही बाइक 15 फेब्रुवारी, 2022 पासून 140 डिलरशिप्समध्ये विक्रीसाठी उपलब्ध असेल.
हे ही वाचा-
- New Baleno features : मारुती सुझुकी बलेनो नव्या अवतारात, बुकिंग सुरु, वाचा काय आहेत वैशिष्ट्ये?
- Tesla Car : थांबायला सांगितलं तरी न ऐकणाऱ्या ड्रायव्हरलेस टेस्ला कार परत बोलावणार
- EV Charging Station : सहज उभारता येईल इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन, 'या' पोर्टलवर मिळणार परवाना
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha
Car loan Information:
Calculate Car Loan EMI