Citroen C3 EV : काही महिन्यांपूर्वी, ऑटोमोबाईल कंपनी Citroen ने भारतात एक नवीन कार लॉन्च केली होती, पेट्रोल इंजिनवर आधारित C3 त्याच्या सेगमेंटमध्ये 6-स्पीड ऑटोमॅटिक टॉर्क कन्व्हर्टरसह आहे, याबाबत आता अशी बातमी येत आहे की, कंपनी Citroen C3 ची इलेक्ट्रिक आवृत्ती तयार करत आहे, जी या वर्षी डिसेंबरपर्यंत लॉंच केली जाऊ शकते. या कारमध्ये काय खास असेल? ते जाणून घ्या


Citroen C3 EV ची पॉवरट्रेन
Citroen C3 च्या इलेक्ट्रिक व्हर्जनमध्ये वापरल्या जाणाऱ्या बॅटरी पॅकबद्दल सध्या कोणतीही ठोस माहिती नाही. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही कार Citroen च्या मॉड्युलर CMP प्लॅटफॉर्मवर तयार केली जात आहे आणि एका अंदाजानुसार ही कार एका चार्जवर सुमारे 350 किमीची रेंज देण्यास सक्षम असेल.


Citroen C3 EV ची वैशिष्ट्ये
कंपनी आपली C3 इलेक्ट्रिक कार प्रीमियम कार म्हणून बाजारात आणू शकते. या कारमध्ये इलेक्ट्रिकली अॅडजस्टेबल ओआरव्हीएम, क्रूझ कंट्रोल, ऑटोमॅटिक एसी, रिअर डिफॉगर, रिअर वायपर आणि वॉशर दिले जाऊ शकतात. यासोबतच त्याच्या लुकमध्येही काही बदल पाहायला मिळतात. यासोबतच कनेक्टेड कार टेक फीचर्स, 10-इंच इन्फोटेनमेंट सिस्टम, वायरलेस मोबाइल फोन चार्जिंग, अँड्रॉइड ऑटोसह ब्लूटूथ आणि Apple कारप्ले यांसारखी वैशिष्ट्ये देखील पाहायला मिळतील. Citroen च्या C3 च्या इलेक्ट्रिक व्हर्जनची किंमत काय असू शकते? जाणून घ्या


Citroen C3 EV किंमत
Citroen कंपनीच्या C3 च्या इलेक्ट्रिक आवृत्तीची किंमत रु. 10-12 लाख (एक्स-शोरूम, दिल्ली) दरम्यान असू शकते. ही कार डिसेंबर 2022 किंवा पुढील वर्षाच्या पहिल्या आठवड्यात लॉन्च केली जाऊ शकते. भारतीय बाजारपेठेत ही कार Tata Tigor EV आणि MG ZS EV सारख्या इलेक्ट्रिक कारशी टक्कर देईल.


महत्वाच्या बातम्या : 


Mahindra Electric Cars: महिंद्रा तयार करत आहे 5 इलेक्ट्रिक कार, जाणून घ्या कधी लॉन्च होणार?


Royal Enfield Electric Bike: रॉयल एनफिल्ड इलेक्ट्रिक बाइक मार्केटमध्ये वर्चस्व गाजवणार! पहिले मॉडेल लवकरच लॉन्च होणार


Hyundai Tucson review: लक्झरियस आणि ADAS सारखे आधुनिक फीचर्स, जाणून घ्या कशी आहे नवीन Hyundai Tucson


2022 Royal Enfield Bullet: येत आहे नवीन बुलेट बाईक, जाणून घ्या किती असेल किंमत आणि फीचर्स


टाटा-पंचचा विक्रमी 'पंच' ; एक लाख विक्रीचा टप्पा गाठणारी सर्वात वेगवान SUV


Car loan Information:

Calculate Car Loan EMI