Mahindra Electric Cars: अलीकडच्या काळात, भारतीय ऑटोमेकर महिंद्रा (Mahindra) ला त्यांच्या SUV कार XUV 700 आणि Scorpio N लाँच करून मोठे यश मिळाले आहे. आता कंपनीने ईव्ही स्पेसमध्येही उतरण्याचे संकेत दिले आहेत. लंडनमधील एका मेगा इव्हेंट दरम्यान, महिंद्राने आपले नवीन इलेक्ट्रिक आर्किटेक्चर प्रदर्शित केले आहे, ज्यावर कंपनीच्या पाच इलेक्ट्रिक SUV कार आधारित असतील. कंपनीच्या म्हणण्यानुसार, प्लॅटफॉर्मवर फोक्सवॅगन एमईबी कंपोनेंट वापरला जाईल.


या इलेक्ट्रिक कार असतील


महिंद्राच्या XUV-e पॅटर्नसह XUV-e1, XUV-e2, XUV-e3, XUV-e5, XUV-e6, XUV-e7, XUV-e8 सारख्या नावांसह  आपल्या आगामी इलेक्ट्रिक कार सादर करेल. यामुळे हे स्पष्ट आहे की कंपनी आपल्या इलेक्ट्रिक कारचे नाव त्याच्या प्रसिद्ध XUV मालिकेचा वापर करेल.


महिंद्रा XUV.e श्रेणीची विक्री करणारी पहिली कंपनी असेल, XUV.e8 मॉडेल डिसेंबर 2024 मध्ये येईल, तर BE मालिकेचे पहिले मॉडेल ऑक्टोबर 2025 मध्ये येईल. कंपनी प्रथम आपली XUV.e श्रेणीची विक्री करेल, ज्याचे XUV.e8 मॉडेल डिसेंबर 2024 मध्ये येईल, तर BE मालिकेचे पहिले मॉडेल ऑक्टोबर 2025 मध्ये येईल. 


बीई रेंज म्हणजे काय
BE श्रेणी BE.05 coupe-SUV ने सुरू होते, ज्याचे उत्पादन  ऑक्टोबर 2025 मध्ये सुरू होईल. हे स्पोर्ट्स इलेक्ट्रिक व्हेइकल म्हणजेच SEV असेल. याच्या हेडलाइट्स आणि मोठ्या एअरडॅमसह समोरच्या डिझाइनमध्ये बोनेटवर एक प्रमुख एअर डक्ट तसेच शार्प कट आणि क्रिझ मिळू शकतात.


महिंद्रा कंपनी ऑक्टोबर 2026 मध्ये BE श्रेणीतील पुढील कार  BE.07 SUV लॉन्च करण्यासाठी सज्ज आहे. या श्रेणीतील शेवटची कार BE.09 असणार आहे, जी BE.05 सारखी कूप-SUV आहे. सध्या कंपनीने BE.09 Concept EV बाबत काहीही सांगितलेले नाही.


महत्वाच्या बातम्या : 


Royal Enfield Electric Bike: रॉयल एनफिल्ड इलेक्ट्रिक बाइक मार्केटमध्ये वर्चस्व गाजवणार! पहिले मॉडेल लवकरच लॉन्च होणार


Hyundai Tucson review: लक्झरियस आणि ADAS सारखे आधुनिक फीचर्स, जाणून घ्या कशी आहे नवीन Hyundai Tucson


2022 Royal Enfield Bullet: येत आहे नवीन बुलेट बाईक, जाणून घ्या किती असेल किंमत आणि फीचर्स


टाटा-पंचचा विक्रमी 'पंच' ; एक लाख विक्रीचा टप्पा गाठणारी सर्वात वेगवान SUV


 


 


 


 


 


Car loan Information:

Calculate Car Loan EMI