Mahindra Jeeto Strong Launched : दिग्गज कार निर्माता कंपनी महिंद्रा (Mahindra) नेहमीच ग्राहकांसाठी वेगवेगळ्या अपडेटेड गाड्या लॉन्च करत असते. नुकतीच महिंद्रा लास्ट माईल मोबिलिटी लिमिटेडने नवीन महिंद्रा जीतो स्ट्रॉंग मिनी ट्रक लॉन्च केला आहे. नवीन Jeeto Strong सह, कंपनीचे लक्ष्य देशात Jeeto रेंजची विक्री आणखी वाढवण्याचे आहे. कंपनीने यापूर्वीच देशात 2 लाखांहून अधिक मालवाहू वाहने विकली आहेत. हा ट्रक सर्वोत्तम मायलेज देणारा, उच्च पेलोड क्षमता असलेला आणि अधिक वैशिष्ट्यांसह सुसज्ज असल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. या ट्रकची आणखी काय वैशिष्ट्ये आहेत ते सविस्तर जाणून घेऊयात.
किंमत किती आहे?
Mahindra Jeeto Strong ही Jeeto Plus (डिझेल आणि CNG) चा सक्सेसर आहे, ज्याची Jeeto Plus च्या तुलनेत 100 kg अतिरिक्त पेलोड क्षमता आहे. Jeeto Strong च्या डिझेल एडिशनची किंमत 5.28 लाख रुपये आहे, तर CNG एडिशनची एक्स-शोरूम किंमत 5.55 लाख रुपये ठेवण्यात आली आहे.
पेलोड क्षमता आणि मायलेज
महिंद्रा जीतो स्ट्रॉंग डिझेल एडिशनची पेलोड क्षमता 815 किलोपेक्षा जास्त आहे, तर CNG एडिशनची पेलोड क्षमता 750 किलो आहे. डिझेल मॉडेलमध्ये 32 किमी प्रति लीटर या विभागात सर्वाधिक मायलेज असल्याचा दावा केला जातो. तर CNG व्हेरियंट 35 किमी/कि.ग्रा.च्या प्रमाणित इंधन कार्यक्षमतेसह येतो. सेगमेंटच्या पहिल्या सब-2 टन ICE कार्गो 4-व्हीलरमध्ये इलेक्ट्रिक व्हॅक्यूम पंप-असिस्टेड ब्रेकिंग, नवीन डिजिटल क्लस्टर आणि सुधारित सस्पेंशन आहे. तुम्हाला जर अधिक चांगला अनुभव हवा असेल तर, महिंद्रा ड्रायव्हरसाठी 10 लाख रुपयांचा मोफत अपघात विमा देखील ऑफर करते. याशिवाय, कंपनी नवीन Jeeto Strong सह 3 वर्षे किंवा 72,000 किमीची वॉरंटीही देत आहे.
कंपनीने काय म्हटले?
या संदर्भात व्यवस्थापकीय संचालक आणि CEO, MLMML सुमन मिश्रा म्हणाले की, “आम्ही सतत ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तसेच त्यांना नवीन काहीतरी देण्याचा प्रयत्न करत आहोत. जीतो स्ट्रॉंग हा मिनी ट्रक उत्तम पेलोड क्षमता असणारा तर आहेच पण त्याचबरोबर या ट्रकचं मायलेजही उत्तम आहे. या ट्रकची किंमतदेखील सामान्य ग्राहकांना परवडेल अशा प्रकारे ठेवण्यात आली आहे. या कारमुळे पैशांची बचत तर होईलच पण ग्राहकांना एक चांगला अनुभव देखील मिळेल यात शंका नाही."
महत्त्वाच्या बातम्या :
Car loan Information:
Calculate Car Loan EMI