Elon Musk's Tesla in India : जगप्रसिद्ध इलेक्ट्रिक कार निर्माती कंपनी टेस्ला (Tesla) लवकरच भारतात येणार आहे. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क (Elon Musk) यांच्या मालकीची अमेरिकन कंपनी (American Multinational Automobile Manufacturer) टेस्ला भारतीय बाजारात प्रवेश करण्याच्या तयारीत आहे. टेस्ला कंपनी (Tesla Company) भारतात दाखल होण्यासाठीच्या जोरदार तयारी सुरु आहे. जानेवारी 2024 पर्यंत यासंदर्भातील सर्व प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी जून महिन्यात पंतप्रधान मोदी यांनी अमेरिका दौऱ्यादरम्यान टेस्लाचे मालक एलॉन मस्क यांची भेट झाली होती. यावेळी टेस्लाने पूर्णपणे असेंबल्ड इलेक्ट्रिक कारवर 40 टक्के आयात शुल्क लावण्याची मागणी केली होती.
टेस्लाला जानेवारी 2024 पर्यंत मंजूरी मिळण्याची शक्यता
जगातील आघाडीची इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्लाला भारतात प्रवेश मिळवून देण्यासाठी सरकारचे प्रयत्न तीव्र झाले आहेत. टेस्लाच्या मार्गातील सर्व अडथळे लवकरच दूर होऊन त्यांना भारतीय बाजारात प्रवेशाचा मार्ग मोकळा होईल. जानेवारी 2024 पर्यंत टेस्ला कंपनीसाठी सर्व आवश्यक मंजुरी देण्याचे काम केंद्र सरकारकडून हाती घेण्यात आलं आहेत. इकॉनॉमिक टाईम्सच्या वृत्तानुसार, पंतप्रधान कार्यालयाने सोमवारी टेस्लाच्या गुंतवणुकीच्या प्रस्तावासह देशातील इलेक्ट्रिक वाहन (EV) उत्पादनाच्या पुढील टप्प्याचा आढावा घेण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली.
पंतप्रधान मोदी आणि मस्क यांची बैठक
एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीचा अजेंडा सामान्य धोरणात्मक बाबींवर केंद्रित होता. त्यासोबतच, या बैठकीत जानेवारी 2024 पर्यंत देशात टेस्लाच्या प्रस्तावित गुंतवणुकीला जलद मंजुरी देण्याबाबत चर्चा झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि टेस्ला प्रमुख एलॉन मस्क यांच्यात गेल्या जूनमध्ये अमेरिकेत भेट झाली होती. या बैठकीनंतर वाणिज्य आणि उद्योग, अवजड उद्योग आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालय टेस्ला भारतात आणण्यासाठीच्या विविध योजनांबद्दल चर्चा करत आहेत.
टेस्लाचं यश एलॉन मस्क यांच्यामुळे
अमेरिकन कार निर्माता कंपनी टेस्ला मोटर्सची स्थापना 2003 साली मार्टिन एबरहार्ड आणि मार्क टार्पेनींग यांनी केली. पण 2008 साली एलॉन मस्क यांनी टेस्ला कंपनीची सूत्रे हाती घेतली आणि टेस्लाचा पुर्नजन्म झाला असं म्हणावं लागेल. टेस्ला कंपनीने 2008 साली स्पोर्ट्स स्टार हे मॉडेल बाजारात आणलं. 2012 साली बाजारात दाखल झालेल्या मॉडेल एसने टेस्लाचा खऱ्या अर्थाने दबदबा निर्माण झाला. त्यानंतर एकामागोमाग एक टेस्लाची मॉडेल यशस्वी होत गेली आणि एलॉन मस्क यांचं यशही वाढत गेलं.
टेस्लाचं पहिलं ऑफिस पुण्यात
टेस्लाचं पहिले भारतातील कार्यालय पुण्याात सुरु होणार आहे. टेस्लानं ऑफिससाठी पुण्यातील विमान नगर भागात पंचशील टेक पार्कची निवड केली आहे. विमान नगर भागातील पंचशील टेक पार्कमध्ये टेस्ला कंपनी जागा भाड्यानं घेतली आहे. इथल्या पहिल्या मजल्यावरील 5 हजार 800 स्क्वेअर फूट जागा टेस्ला कंपनीनं तीन वर्षांसाठी भाड्यानं घेतली आहे. याचं मासिक भाडं 11.65 लाख रुपये असणार आहे. ऑटोमोबाईल हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्याला टेस्लाच्या येण्याने प्रगतीच्या आणखी मोठ्या संधी खुल्या होणार आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Tesla Indian CFO : भारतीय वंशाचे वैभव तनेजा टेस्लाच्या CFO पदी, एलॉन मस्क यांचा मोठा निर्णय
Car loan Information:
Calculate Car Loan EMI