Mahindra XUV 3XO: अलिकडच्या काळात महिंद्रा कंपनीच्या (Mahindra Company) गाड्यांना लोकांची मोठ्या प्रमाणात पसंती मिळत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. कंपनी नवनवीन गाड्या लाँच करत आहे. महिंद्राने नुकतीच SUV XUV 3XO गाडी लाँच केली आहे. ही गाडी लोकांना खूप आवडली आहे. कंपनीने पहिल्या आठवड्यातच या कारच्या 10 हजार गाड्या वितरित केल्या आहेत.


Mahindra XUV 3XO भारतीय बाजारपेठेत लॉन्च झाल्यानंतर लोकप्रिय झाली आहे. महिंद्राने ही SUV 29 एप्रिल रोजी लॉन्च केली होती. कंपनीने 26 मे पासून या वाहनाची डिलिव्हरी सुरु केली होती. या कारच्या विक्रीबद्दल बोलायचे झाले तर, कंपनीने पहिल्या आठवड्यातच 10 हजार युनिट्सची डिलिव्हरी केली होती. वाहन विक्रीच्या बाबतीत, महिंद्रा XUV 3XO ने आपल्या प्रतिस्पर्धी वाहनांना मागे टाकले आहे.


पहिल्या तीन दिवसांत ग्राहकांना 2500 गाड्यांची विक्री


महिंद्रा XUV 3XO ने विक्रीच्या पहिल्या आठवड्यातच दहा हजार युनिट्सचा आकडा पार केला होता. कंपनीने पहिल्या तीन दिवसांत आपल्या ग्राहकांना 2500 युनिट्स वितरित केल्या होत्या. पुढील चार दिवसांत या वाहनाच्या विक्रीत बंपर वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर कंपनीने त्या चार दिवसांत सुमारे 7500 युनिट्सची डिलिव्हरी केली. यासह हा आकडा एका आठवड्यात दहा हजारांच्या पुढे गेला आहे. Hyundai Venue आणि Kia Sonet च्या प्रतिस्पर्धी वाहनांमध्ये Mahindra XUV 3XO चा समावेश आहे. त्याचवेळी महिंद्राने या कारची एक महिन्याची विक्री अवघ्या एका आठवड्यात कव्हर करुन ती मागे टाकली. Mahindra XUV 3XO ही कार कंपनीच्या जुन्या SUV XUV300 चे नवीन मॉडेल आहे. ऑटोमेकरने सब-कॉम्पॅक्ट सेगमेंटमधील पोर्टफोलिओ सुधारण्यासाठी ही नवीन SUV लॉन्च केली आहे.


महिंद्र XUV 3XO ची किंमत किती?


Mahindra XUV 3XO ची एक्स-शोरुम किंमत 7.49 लाख रुपयांपासून सुरू होते. महिंद्राने आतापर्यंत फक्त त्याचे एंट्री-लेव्हल M1, MX2 आणि MX2 प्रो व्हेरियंटचे वितरण सुरू केले आहे. या प्रकारांची एक्स-शोरूम किंमत 10 लाख रुपयांपासून ते 13.50 लाख रुपयांपर्यंत आहे. कंपनी या महिन्यापासून AX7 आणि AX7 L या टॉप-एंड प्रकारांची डिलिव्हरी सुरू करू शकते. 


Mahindra XUV 3XO चे वेगळेपण काय?


महिंद्राने नवीन तंत्रज्ञान आणि आरामदायी वैशिष्ट्यांसह ही नवी एसयूव्ही बाजारात आणली आहे. Mahindra XUV 3XO मध्ये पॅनोरामिक सनरूफसह ADAS तंत्रज्ञानाचे वैशिष्ट्य आहे. या कारमध्ये 17-इंच अलॉय व्हील्स आहेत. ड्युअल-झोन क्लायमेट कंट्रोल आहे. हे सर्व फीचर्स या सेगमेंटच्या कारमध्ये पहिल्यांदाच आले आहेत. महिंद्राच्या कारमध्ये 10.2-इंचाची इन्फोटेनमेंट स्क्रीन आहे. कारमध्ये इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक, 6 एअरबॅग आणि वायरलेस चार्जिंगची सुविधाही देण्यात आली आहे.


महत्वाच्या बातम्या:


Jeep India Offer : जगात भारी ऑफर! जीप इंडियाच्या गाड्यांवर 12 लाखांपर्यंतची सूट मिळणार


Car loan Information:

Calculate Car Loan EMI