Ather 450X Electric Scooters: बंगळुरू स्थित EV मेकर अ‍ॅथर एनर्जीने (Ather Energy) लवकरत आंतरराष्ट्रीय बाजारात पाऊल ठेवणार आहे. ज्याची सुरुवात शेजारील देश नेपाळपासून होईल. आपल्या बिझनेस प्लॅनबद्दल माहिती देताना कंपनीने सांगितलं, कंपनी लवकरच आंतरराष्ट्रीय बाजारात आपली फ्लॅगशिप स्कूटर 450X लाँच करणार आहे. जी नेपाळस्थित वैद्य एनर्जीसोबत भागीदारीमध्ये (Partnership) असेल. कंपनीचा पहिला सेटअप नोव्हेंबरमध्ये काठमांडूमध्ये (Kathmandu) उघडला जाईल.


अ‍ॅथर एनर्जीची नेपाळमध्ये एन्ट्री


या भागीदारीअंतर्गत, वैद्य एनर्जी नेपाळमधील अ‍ॅथर एनर्जी उत्पादनांची विक्री आणि सर्व्हिस सांभाळणार आहे. यासोबतच, Ather ग्रीडची स्थापना करुन जलद चार्जिंग स्टेशन्स (Fast Charging Stations) देखील स्थापित करणार आहे, जेणेकरून ग्राहकांना ईव्ही चार्ज करता येईल आणि कोणत्याही समस्येला सामोरं जावं लागणार आहे.


ही असेल संभाव्य किंमत


मात्र, नेपाळमध्ये या स्कूटरची किंमत काय असेल याबाबत कंपनीने अद्याप कुठलाही खुलासा केलेला नाही. पण त्याची किंमत एक्स-शोरूम 4 लाखांच्या आसपास ठेवली जाण्याची शक्यता आहे.


अ‍ॅथर 450 एक्स पॉवर पॅक, फिचर्स, रेंज आणि टॉप स्पीड 


अ‍ॅथर 450 एक्स स्कूटरमध्ये 2.9kWh आणि 3.7kWh क्षमतेचा बॅटरी पॅक दिला आहे, जो आधीच्या मॉडेलपेक्षा अधिक पॉवरफुल आहे. आधीच्या मॉडेलपेक्षा यात २५ टक्के अधिक बॅकअप मिळतो. या स्कूटरची बॅटरी एकदा चार्ज केल्यावर ही स्कूटर 146 किलोमीटरपर्यंतची रेंज देते. ही रेंज एआरएआय सर्टिफाईड आहे.


या स्कूटरला देते टक्कर


Ather 450X शी स्पर्धा करणाऱ्या स्कूटरमध्ये Ola S1 Pro, Ola S1X, बजाज चेतक, TVS iQube सारख्या EV चा समावेश आहे.


जागतिक बाजारात एन्ट्री


दिवसेंदिवस जगभरात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढत आहे. त्यातही प्रामुख्याने इलेक्ट्रिक स्कूटर्सना बाजारात चांगलीच डिमांड आहे. यामुळे भारतीय कंपनी एथर देखील जागतिक स्पर्धेत उतरली आहे. स्कूटर अधिक रेंज देणाऱ्या असाव्यात अशी ग्राहकांची मागणी आहे, त्यामुळे तशा उत्पादनावर भर दिला जात आहे. जागतिक बाजारपेठेत आता मोठ्या रेंजसह इलेक्ट्रिक स्कूटर्स दाखल होत आहेत.


यामुळेच बंगळुरुस्थित इलेक्ट्रिक वाहन निर्माती कंपनी अ‍ॅथर एनर्जी आता त्यांची लोकप्रिय इलेक्ट्रिक स्कूटर अ‍ॅथर 450 एक्स (Ather 450X) नेपाळमध्ये लाँच करत आहे. या मॉडेलची किंमत भारतात 1.20 लाखांच्या आसपास आहे. परंतु जागतिक बाजारपेठेत कंपनी गाडीची किंमत वाढवण्याची शक्यता आहे.


हेही वाचा:


Autonomous Emergency Braking: कारमध्ये असणारे ऑटोनॉमस एमरजेंसी ब्रेकिंग म्हणजे काय? त्याचा वापर कसा होतो? जाणून घ्या


Car loan Information:

Calculate Car Loan EMI