Viral Video: विज्ञान क्षेत्रात भारत बराच पुढे गेला आहे, याचा पुरावा चांद्रयान-3 चं यशस्वी लाँचिंग आहे. त्याच प्रकारे भारतातील प्रत्येक गावाच्या कानाकोपऱ्यात देखील असेच काही शास्त्रज्ञांप्रमाणे बुद्धी असणारे लोक आहेत, ज्यांनी एकापेक्षा एक जुगाड करुन अशा अनोख्या वस्तू बनवल्या ज्याची आपण कल्पनाही करू शकत नाही. असाच एक व्हिडीओ सध्या चर्चेत (Viral Video) आहे, ज्यात दोन तरुणांनी चक्क खाटेपासून चारचाकी गाडी (Four Wheeler Car) तयार केली आहे.


खाटेला इंजिन लावून बनवली चारचाकी गाडी


तरुणांच्या या जुगाडू वृत्तीची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे. या व्हिडीओतील तरुणांनी घरी झोपण्यासाठी वापरत असलेल्या खाटेला इंजिन बसवून एक चारचाकी गाडी बनवली आहे. जी पाहून तुम्हीही म्हणाल, याला म्हणतात असली जुगाड. सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ पाहून अनेक लोक अवाक झाले आहेत. भारतात जुगाडू लोकांची कमतरता नाही, हे यावरुन आणखी सिद्ध होतं.


खाटेच्या गाडीत भरलं पेट्रोल


दोन युवकांनी खाटेच्या मदतीने ही गाडी बनवली आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, या तरुणांनी खाटेच्या चारही पायांना चाकं लावली आहेत. फक्त चाकंच नव्हे, तर त्यांनी खाटेला पेट्रोल टँक देखील फिट केला आहे, जेणेकरुन गाडी पळू शकेल. तरुणांचा हा जुगाड पाहून सारेच हैराण झाले आहेत. कुणाचाच यावर विश्वास बसत नाही. व्हिडीओमध्ये दिसतं की, हे तरुण त्यांच्या गाडीत पेट्रोल भरण्यासाठी पेट्रोल पंपाच्या दिशेने येतात.


जेव्हा ते पेट्रोल पंपावर थांबतात, तेव्हा त्यांची गाडी पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसतो. कारण ही गाडी एकदम विचित्र होती. या तरुणांनी खाटेचं चक्क एका गाडीत रूपांतर केलं होतं. खाटेच्या मध्यभागी एक स्टिअरिंगदेखील बसवलं होतं, ज्यामुळे त्यांची जुगाडू गाडी रस्त्यावर सुसाट धावत आहे.






सोशल मीडियावर लोकांनाही धक्का


व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ पाहून अनेक लोक अवाक झाले. तरुणांचा हा जुगाड पाहिल्यानंतर अनेक लोकांनी त्यांचं खूप कौतुकही केलं. यावर एका व्यक्तीने लिहीलं की, 'कोणीतरी हा व्हिडीओ आनंद महिंद्रांना पाठवा.' तर एकाने म्हटलं की, 'हा व्हिडीओ पाहून लोक का हसत आहेत, हे समजत नाही. हे त्या लोकांसाठी एक चांगलं इनोव्हेशन, ज्यांनी काही शिक्षणच नाही घेतलं'. तर एकाने म्हटलं, 'असं कुणावर हसू नये. हे बनवण्यासाठी देखील प्रचंड मेहनत आणि डोकं लागतं'


हेही वाचा:


Israel Hamas War: इस्रायलमध्ये 'मृत्यू तांडव'; महिलांवर अमानुष अत्याचार, पाहा 'हे' 5 हृदय पिळवटून टाकणारे व्हिडीओ


Car loan Information:

Calculate Car Loan EMI