Solar Car: सध्या जगभरात इलेक्ट्रिक कारचा मोठा गवगवा आहे. मात्र आता इलेक्ट्रिक कारला टक्कर देण्यासाठी सोलर कार येत आहे. अमेरिकेतील स्टार्ट-अप कंपनी Aptera EV ने आपल्या सोलर कार सादर केली आहे. ही एक हायब्रीड कार आहे, जी बॅटरी आणि सोलर चार्जिंग या दोन्हीवर धावू शकते. याची खास गोष्ट म्हणजे ही कारएकदा फुल्ल चार्ज केल्यावर तब्बल 1609 किमी धावू शकते, असा दावा कंपनीने केला आहे. ही कार भविष्यकालीन डिझाइनवर आधारित आहे. ज्यामुळे ती कमाल 177 किमी/तास वेगाने धावू शकते.


ही एक सोलर कार आहे, ज्यामुळे वीज नसतानाही ती सूर्यप्रकाशाने चार्ज होऊ शकते. सूर्यप्रकाशासह ही कार एका दिवसात 64 किलोमीटर धावण्यासाठी चार्ज केली जाऊ शकते. जर तुम्ही ही कार 64 किलोमीटरपेक्षा कमी चालवली तर तुम्हाला ती चार्ज करण्याची गरज भासणार नाही.


या कारच्या बाहेरील बाजूस सोलर पॅनल्स बसवण्यात आले आहेत. ज्यामुळे ती दिवसभर उन्हात चार्ज होत राहते. एवढेच नाही तर रस्त्यावरून चालतानाही ही कार चार्ज होते. ही फक्त सौर उर्जेवरून 700W चार्ज होते. या कारच्या बॅटरी आणि मोटरबद्दल बोलायचे झाले तर, तर यात 150 kWh ची पॉवरफुल मोटर बसवण्यात आली आहे. कारची मोटर या कारला वेगवेगळ्या प्रकारच्या रस्त्यांवर चालवण्यास पुरेशी पॉवर देते.


या कारला एरोडायनामिक आकार देण्यात आला आहे. ज्यामुळे ही कार तिच्यावर येणाऱ्या हवेचा दाब कमी करू शकते. हवेचा दाब कमी करण्यासाठी गाडीची चाके झाकलेली असतात. कारची रचना अशा प्रकारे करण्यात आली आहे की हिला थंड होण्यात कोणतीही अडचण येत नाही. या कारच्या आत दोन लोकांसाठी सीट आणि वरच्या दिशेने उघडणारे दोन दरवाजे देण्यात आले आहेत.


किंमत 


सध्या कंपनीने या सोलर कारची किंमत 25900 डॉलर्स (जवळपास 21 लाख रुपये) निश्चित केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात विक्रीसाठी कंपनीने आधीच बुकिंग सुरू केली आहे. ग्राहकांना ही कार कंपनीच्या वेबसाइटवर बुक करता येईल.


दरम्यान, ही कार विकसित करण्यासाठी Aptera कंपनीने क्राउडफंडिंगद्वारे पैसे उभे केले होते. कंपनीने या कारचे पहिले प्रोटोटाइप मॉडेल 2019 मध्ये सादर केले होते. मात्र, निधीअभावी कंपनीने 2021 मध्ये प्रकल्प पूर्ण केला. Aptera ची ही सोलर कार कंपनीच्या पहिल्या सोलर कार 'Aptera 2 Series' पासून प्रेरित आहे. जी तीन चाके असलेली दोन सीटर कार आहे. या कारला पूर्ण चार्ज केल्यावर 120 किमीची रेंज मिळते.


Car loan Information:

Calculate Car Loan EMI