Maruti Suzuki Grand Vitara Launch Date In India: गेल्या अनेक दिवसांपासून ग्राहक ज्याची प्रतीक्षा करत होते ती Maruti Suzuki Grand Vitara अखेर लॉन्चसाठी सज्ज झाली आहे. कंपनी आपली ही बहुप्रतीक्षित कार 26 सप्टेंबर रोजी भारतीय बाजारात उतरवणार आहे. ही कार लॉन्च होण्याआधीच याच्या 55 हजार युनिट्सची बुकिंग झाली असून अजूनही याची बुकिंग सुरु आहे. चला तर या कारबद्दल आणखी माहिती जाणून घेऊ.

  


मारुती सुझुकीच्य नवीन  ग्रँड विटारामध्ये ऑल-व्हील ड्राइव्ह (AWD) आणि 2-व्हील ड्राइव्ह असे दोन ड्रायव्हिंग मोड मिळणार आहेत. यात हेड-अप डिस्प्ले (HUD), 360-व्ह्यू कॅमेरा, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम (TPMS), हेड-अप डिस्प्ले, 9-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम (ABS), Android Auto आणि Apple CarPlay सारखे फीचर्स ग्राहकांना मिळणार आहे. तसेच यात 6-स्पीकर आर्कॅमिस ऑडिओ सिस्टम, हिल असिस्ट, EBD, अॅम्बियंट लाइटिंग, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स, पॅरानोमिक सनरूफ, पार्किंग कॅमेरे आणि एकाहूनअधिक एअरबॅग्ज दिले जाणार आहे. 


ग्रँड विटाराला ही माईल्ड-हायब्रीड आणि इलेक्ट्रिक तंत्रज्ञानासह लॉन्च करण्यात येईल. हेच तंत्रज्ञान हायराइडर आणि निओ ड्राइव्हमध्ये पाहायला मिळतो. Grand Vitara च्या माईल्ड-हायब्रीड ट्रिममध्ये 1.5-L K15C ड्युअल-जेट पेट्रोल इंजिन मिळेल. जे 102 Bhp पॉवर आणि 137 Nm टॉर्क निर्माण करण्यास सक्षम असेल. यात 5-स्पीड मॅन्युअल आणि 6-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचा पर्याय देखील मिळणार आहे. हेच इंजिन मारुतीच्या एर्टिगा आणि XL6 फेसलिफ्टमध्ये देखील देण्यात आले आहे. 


किती असेल किंमत? 


या कारच्या किंमतीत बद्दल अद्याप कंपनीकडून कोणतीही माहिती उघड करण्यात आलेली नाही. मात्र Financial Express ने दिलेल्या वृत्तानुसार ही कार एकूण सात प्रकारात लॉन्च केली जाऊ शकते. याच्या बेस मॉडेलची किंमत 9.50 लाख, डेल्टा प्रकारची किंमत 11 लाख रुपये, जेटा 12 लाख रुपये, अल्फाची किंमत 12.50 लाख रुपये आणि अल्फा AWD ची किंमत 15.50 लाख रुपये असू शकते. तसेच याच्या स्ट्रॉंग हायब्रीड मॉडेल जेटा प्लसची किंमत 17 लाख रुपये असू शकते. तसेच अल्फा प्लसची किंमत 18 लाख रुपये असू शकते.


महत्वाच्या बातम्या : 



 


Car loan Information:

Calculate Car Loan EMI