Yamaha X-Force Features:  प्रसिद्ध दुचाकी उत्पादक कंपनी Yamaha ने आपली नवीन Yamaha X Force Scooter लॉन्च केली आहे. कंपनीने ही स्कूटर जपानमध्ये लॉन्च केली आहे. नवीन स्कूटरमध्ये 155CC चे पॉवरफुल इंजिन देण्यात आले आहे. भारतात विकल्या जाणार्‍या YZF R15 बाईकमध्ये हे इंजिन उपलब्ध आहे. यामाहाच्या नवीन स्कूटरमध्ये वापरकर्त्यांना एलईडी लाईट, एलसीडी डिस्प्ले आणि ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी यांसारखे उत्कृष्ट फीचर्स मिळणार.


Yamaha च्या नवीन स्कूटर X-Force मध्ये 155CC लिक्विड-कूल्ड सिंगल सिलेंडर मोटरसह नॉक केले आहे. हे इंजिन व्हेरिएबल वाल्व्ह ऍक्च्युएशन (VAA) वैशिष्ट्यासह येते. वापरकर्त्यांना यामध्ये पारंपरिक टेलिस्कोपिक फ्रंट फोर्क्स आणि ड्युअल रिअर शॉक मिळतात. ब्रेकिंगसाठी यात पुढील बाजूस डिस्क ब्रेक आणि मागील बाजूस ड्युअल-चॅनल ABS चे सेफ्टी किट मिळते.


यामाहाने हेवी फ्रंट डिझाईन असलेली नवीन स्कूटर बाजारात आणली आहे. स्प्लिट एलईडी हेडलॅम्प सेटअप या नवीन स्कूटरमध्ये उपलब्ध आहे. लाइटिंगसह स्मोक्ड व्हिझर स्कूटरला स्पोर्टी लुक देते. X-Force ला Aerox 155 ऐवजी फ्लॅट फूटबोर्ड मिळतो. ग्राहकांना यात मोठा स्पेस मिळणार आहे.


फीचर्स 


कंपनीने नवीन स्कूटरमध्ये अनेक उत्कृष्ट फीचर्स दिले आहेत. स्कूटरमध्ये एलईडी लाईट्सचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला आहे. तसेच स्मार्ट फीचर्स अंतर्गत यूएसबी चार्जिंग सॉकेट आणि एलसीडी डिस्प्ले दिले आहेत. याशिवाय यात ग्राहकांना ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी देखील मिळते. यामाहाने ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टम (TCS) देखील प्रदान केली आहे, जी तुमची राइड अधिक सुरक्षित करते.


किंमत 


यामाहाने जपानमध्ये एक्स-फोर्स सादर केली आहे. नवीन स्कूटरची प्रारंभिक किंमत 3,96,000 JPY (अंदाजे रु. 2.30) आहे. ही किंमत भारतात विकल्या जाणार्‍या Aerox 155 पेक्षा खूप जास्त आहे. दरम्यान भारतात यामाहा आपली ही नवीन स्कूटर लॉन्च करणार का, हे अद्याप कळू शकलेलं नाही.


महत्वाच्या बातम्या : 



Car loan Information:

Calculate Car Loan EMI