Bajaj Chetak Electric Scooter: बजाज मोटर्सने त्यांच्या पुणे येथील प्लांटमध्ये एक नवीन इलेक्ट्रिक वाहन उत्पादन लाइन लाँच केली आहे. या प्लांटमध्ये कंपनीने प्रति महिना 5,000 चेतक इलेक्ट्रिक स्कूटर तयार करण्याचे लक्ष ठेवलं आहे. कंपनी आता आपले सर्व इलेक्ट्रिक दुचाकी चेतक टेक्नॉलॉजी लिमिटेड अंतर्गत आणणार असून कंपनी नवीन प्लांटमध्ये 5 लाख दुचाकींचे उत्पादन करणार आहे.


बजाजने ऑक्टोबर 2019 मध्ये त्यांची लोकप्रिय स्कूटर चेतक इलेक्ट्रिक अवतारात लॉन्च केली होती. या स्कूटरला सुरुवातीला चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र कोविडमुळे उत्पादनात घट झाली होती. अशा परिस्थितीत कंपनीने काही काळ बुकिंग घेणेही बंद केले होते, तर सुरुवातीला ही स्कूटर फक्त 2 शहरांमध्ये उपलब्ध होती. परंतु आता कंपनीने ते देशभरातील सर्व प्रमुख शहरांमध्ये ही स्कूटर लॉन्च केली आहे.


चेतक इलेक्ट्रिक स्कूटरच्या मागणीत आता वाढ झाली आहे, हे लक्षात घेऊन कंपनी चेतकच्या निर्मितीसाठी स्वतंत्र उत्पादन लाइन तयार करत आहे. बजाजचा अंदाज आहे की, ते दर महिन्याला चेतकच्या सुमारे 5000 युनिट्सचे उत्पादन करणार आहेत. कंपनीने मे महिन्यात 2500 युनिट्सचे उत्पादन केले होते. जे आतापर्यंतचे सर्वाधिक होते.


बजाज चेतकला आजपर्यंत 16,000 हून अधिक बुकिंग मिळाले आहेत आणि 14,000 चेतक स्कूटर वितरित करण्यात आल्या आहेत. या स्कूटरला देशाच्या अनेक भागातून मागणी येत आहे, त्यामुळे या दिशेने पाऊल टाकत कंपनीने उत्पादनाला गती देण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनी आगामी काळात उत्पादन वाढवेल आणि दररोज 800 इलेक्ट्रिक स्कूटर तयार करेल.


नवीन प्लांटबद्दल सांगायचे झाले तर कंपनीचा हा प्लांट 6.5 एकरांवर पसरलेला असून येथे दरवर्षी 5 लाख दुचाकींचे उत्पादन होऊ शकते. कंपनी उपकरण पुरवठादारांशी ऑनलाइन संपर्क साधू शकते आणि त्यांना तासाभरात उपकरणे मिळतील. या इलेक्ट्रिक स्कूटरसाठी 90% उपकरणे प्लांटच्या 25 किमीच्या परिसरात उपस्थित असलेल्या स्थानिक विक्रेत्यांकडून घेतली जातील.


Car loan Information:

Calculate Car Loan EMI