Chinese Electric Car: आगामी काळात भारतीय ऑटोमोबाईल बाजार इलेक्ट्रिक वाहनांसाठी मोठी बाजारपेठ बनणार आहे. अशा परिस्थितीत केवळ देशीच नव्हे तर विदेशी इलेक्ट्रिक वाहन उत्पादकांनाही भारतात आपली पकड मजबूत करायची आहे. यामुळे चिनी कार निर्माता BYD (Build Your Dreams) आपली BYD Atto 3 इलेक्ट्रिक कारसह भारतीय बाजारात एंट्री करणार आहे.
या कारची लांबी 4,455 मिमी, रुंदी 1,875 मिमी आहे आणि तिचा व्हीलबेस 2,720 मिमी आहे. BYD Atto 3 ही अत्यंत आरामदायी कार असल्याचं कंपनीचं म्हणणं आहे. यासोबतच ही एक पॉवरफुल कार आहे. BYD Atto 3 ची परमनंट मॅग्नेट सिंक्रोनस मोटर 204 Bhp पॉवर आणि 310 Nm पीक टॉर्क जनरेट करते. कंपनीचा दावा आहे की, ही कार फक्त 7.3 सेकंदात 0-100 किमी प्रतितास वेग पकडते. हिचे वजन 1,680-1,750 किलो दरम्यान आहे. BYD Atto 3 आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत दोन बॅटरी पॅकच्या पर्यायासह उपलब्ध आहे, ज्यामध्ये 49.92kWh आणि 60.48kWh बॅटरी पॅकचा समावेश आहे. हे बॅटरी पॅक या कारला अनुक्रमे 320 किमी आणि 420 किमीची WLTP रेंज देतात. BYD Atto 3 कंपनीचे पेटंट ब्लेड बॅटरी तंत्रज्ञान वापरते आहे. जे इतर बॅटरी तंत्रज्ञानापेक्षा प्रतिकूल परिस्थितीत सुरक्षित आणि अधिक क्षमाशील असल्याचा दावा केला जातो.
या कारच्या आंतरराष्ट्रीय आवृत्तीच्या फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, यात एलईडी हेडलॅम्प, 18-इंच अलॉय व्हील, पॅनोरॅमिक सनरूफ, पॉवर्ड फ्रंट सीट्स, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, 12.8-इंच रोटेटिंग टचस्क्रीन, इलेक्ट्रिक टेल गेट आणि अॅम्बियंट लाइटिंग सारखे फीचर्स देण्यात आले आहे. तज्ज्ञांच्या मते, या कारची प्रारंभिक किंमत 30 लाख रुपयांच्या दरम्यान असेल.
फीचर्स आणि किंमत
या कारच्या आंतरराष्ट्रीय आवृत्तीच्या फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, यात एलईडी हेडलॅम्प, 18-इंच अलॉय व्हील, पॅनोरॅमिक सनरूफ, पॉवर्ड फ्रंट सीट्स, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, 12.8-इंच रोटेटिंग टचस्क्रीन, इलेक्ट्रिक टेल गेट आणि अॅम्बियंट लाइटिंग सारखे फीचर्स देण्यात आले आहे. सेफ्टी फीचर्समध्ये यात सात एअरबॅग्ज, ईएसपी, हिल डिसेंट कंट्रोल, 360 डिग्री कॅमेरा आणि टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम सारखे फीचर्स देण्यात आले आहेत.
Car loan Information:
Calculate Car Loan EMI