Komaki Venice Eco: दुचाकी निर्माता कंपनी Komaki आपली नवीन इलेक्ट्रिक स्कूटर भारतात लॉन्च केली आहे. Komaki Venice Eeco असं या इलेक्ट्रिक स्कूटरचे नाव आहे. ही एक हाय स्पीड इलेक्ट्रिक स्कूटर आहे जी 79,000 रुपये (एक्स-शोरूम) च्या किमतीत भारतात लॉन्च करण्यात आली आहे. या किंमतीत ही देशातली सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर आहे. 


नवीन कोमाकी व्हेनिस सात रंगात कंपनीने सादर केली आहे. तसेच याचा टॅब सारखा TFT डिस्प्ले स्कूटर रायडरला चांगला नेव्हिगेशन अनुभव देईल, असा दावा कंपनीने केला आहे. स्कूटरमध्ये इंटिग्रेटेड म्युझिक प्लेयर सिस्टम देखील आहे. म्युझिक सिस्टीमसाठी स्कूटरमध्ये स्पीकर लावण्यात आले आहेत. कोमाकी व्हेनिस इको लिथियममध्ये फेरो फॉस्फेट (LiPO4) बॅटरी देण्यात आली आहे. या स्कूटरमध्ये रिअल-टाइम लिथियम-आयन बॅटरी अॅनालायझरही बसवण्यात आले आहे. याच्या लॉन्चिंगनंतर नवीन कोमाकी व्हेनिस कंपनीच्या 11 लो-स्पीड आणि 6 हाय-स्पीड इलेक्ट्रिक स्कूटरच्या यादीत सामील झाली आहे.


कोमाकी इलेक्ट्रिक डिव्हिजनचे संचालक गुंजन मल्होत्रा ​​म्हणाले, “कोमाकी ही ग्रीन आणि क्लीन मोबिलिटी डोमेनमधील एक आघाडीची स्कूटर म्हणून समोर येईल. कंपनी हाय रेंज, हाय परफॉर्मन्स, सेफ्टी आणि मजबूत डिझाइन केलेली इलेक्ट्रिक वाहने तयार करत आहे. कोमाकी स्कूटरचा देखभाल खर्च खूपच कमी असून दीर्घ कालावधीसाठी ही स्कूटर विश्वासार्ह राइड प्रदान करते.”


Komaki Venice Eeco ची डिझाइन चांगल्या नेव्हिगेशन आणि राइडसाठी तिसऱ्या पिढीच्या TFT स्क्रीनसह सादर करण्यात आली आहे. ही हाय-स्पीड स्कूटर फायर प्रूफ लिथियम फेरो फॉस्फेट (LFP) बॅटरी आणि रिअल टाइम लिथियम बॅटरीने सुसज्ज आहे. लिथियम फेरो फॉस्फेट सेल फायर प्रूफ आणि सुरक्षित मानली जाते. कंपनीने आपल्या व्हेनिस इलेक्ट्रिक स्कूटरला आगीपासून सुरक्षित ठेवण्यासाठी LFP बॅटरीसह विविध सेन्सर्सचा वापर केला आहे. कंपनी या स्कूटरमध्ये अॅडव्हान्स बॅटरी मॅनेजमेंट सिस्टमचा वापर करत आहे. कंपनीचा दावा आहे की, स्कूटरमध्ये दिलेली बॅटरी 2000 पेक्षा जास्त चार्जिंग सायकलपर्यंत टिकू शकते. ही स्कूटर गार्नेट रेड, सॅक्रामेंटो ग्रीन, जेट ब्लॅक, मेटॅलिक ब्लू, ब्राइट ऑरेंज आणि सिल्व्हर क्रोम कलर ऑप्शन्समध्ये लॉन्च करण्यात आली आहे.


इतर महत्वाच्या बातम्या: 


Tiago EV Review: Tata Tiago EV फर्स्ट लूक रिव्ह्यू, जाणून घ्या कशी आहे ही कार
Tata Tiago EV vs Tigor EV: टाटा टियागो आणि टाटा टिगोर या दोन इलेक्ट्रिक कारमध्ये कोणती आहे बेस्ट? जाणून घ्या


Car loan Information:

Calculate Car Loan EMI