Skoda Kushaq: भारतात ऑटो सेक्टरची सातत्याने प्रगती होत आहे. तर पुणे हे आता जगात वाहन उत्पादक कंपन्यांचं केंद्र बिंदू म्हणून समोर येत आहे. आधी भारतात मोठ्या प्रमाणात विदेशी कार आयात केल्या जात होत्या. मात्र आता अनेक परदेशी कंपन्यांनी आपले वाहन उत्पादन प्लांट येथे बनवल्याने आता भारतातून परदेशात वाहन निर्यात करण्याचे प्रमाण वाढले आहे. यातच स्कोडा इंडियाची मेड इन इंडिया लोकप्रिय मिड-साइड SUV Kushaq जागतिक बाजारात विक्रीसाठी सज्ज आहे. याबाबत स्कोडाने माहिती देत सांगितलं आहे की, कंपनीने अरब गल्फ कॉर्पोरेशन कौन्सिल (AGCC) मध्ये समाविष्ट असलेल्या देशांमध्ये लेफ्ट हँड ड्रायव्हिंग मोडसह कुशकची निर्यात सुरू केली आहे. 


दोन नवीन व्हेरिएंट केले जाणार निर्यात 


आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत स्कोडा आपल्या कुशकच्या लेफ्ट-हँड ड्राइव्ह आणि लेफ्ट-हँड ड्राइव्ह व्हेरिएंट कारची निर्यात करेल. कंपनी या कारचे उत्पादन पुण्यातील चाकण प्लांटमध्ये केले आहे. ही कार देशातील Hyundai Creta आणि Kia Seltos शी स्पर्धा करते.


फीचर्स 
 
Skoda च्या Kushak मध्ये सिंगल-पॅनोरामिक सनरूफ, आठ इंचाचा डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, वायरलेस फोन चार्जिंग, सहा स्पीकर, 8-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी, स्टाइल आणि मॉन्टे कार्लो व्हेरिएंटमध्ये हवेशीर फ्रंट सीट्स यांसारखी फीचर्स देण्यात आले आहे. याशिवाय यात अनेक सेफ्टी फीचर्सही देण्यात आली आहेत.


या कारही केल्या जातात निर्यात


स्कोडा ऑटो ही फोक्सवॅगन ग्रुपचा भाग आहे, ज्यामध्ये फोक्सवॅगन, ऑडी, स्कोडा, पोर्श आणि लॅम्बोर्गिनी यांचा समावेश आहे. कंपनीने गेल्या महिन्यात टिगुन आणि व्हर्टसची निर्यातही सुरू केली आहे. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक पीयूष अरोरा म्हणाले की, फोक्सवॅगन समूहाने आतापर्यंत 5.5 लाख कार निर्यात केल्या आहेत आणि कुशक ही तिसरी भारतात बनवलेली कार आहे, जी निर्यात केली जात आहे.


किंमत 


भारतात या कंपनीची कार 11.29 लाख ते 19.49 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत उपलब्ध आहे. या कारची भारतात चांगली विक्री होत आहे.


इतर महत्वाच्या बातम्या: 


Aston Martin DBX 707 भारतात लॉन्च! दिसायला देखणी आणि दमदार, 4.63 कोटींच्या या कारमध्ये जाणून घ्या काय आहे खास


Tiago EV Review: Tata Tiago EV फर्स्ट लूक रिव्ह्यू, जाणून घ्या कशी आहे ही कार




 


Car loan Information:

Calculate Car Loan EMI