Kia EV6 Price in India: किया भारतात आपली पहिली इलेक्ट्रिक कार सादर करण्यासाठी सज्ज आहे. कंपनीने या कारचे नाव Kia EV6 असे ठेवले आहे. ही एक प्रीमियम क्रॉसओव्हर असेल. भारतात लवकरच या कारची बुकिंग सुरू होणार आहे. ही कार फक्त Kia डीलर्सद्वारे विकली जाणार आहे. भारतीय बाजारपेठेत या कारच्या फक्त 100 युनिट्स विकल्या जाणार आहेत. चला तर या कारच्या फीचर्स आणि किंमतबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ..


ही संपूर्ण आयात कार असल्याने EV6 ची किंमत सुमारे 55 लाख रुपयांपेक्षा अधिक असू शकते. याची किंमत व्हेरिएंटनुसार कमी जास्त होऊ शकते. Kia च्या कारमध्ये कंपनीने  77.4 kWh बॅटरी पॅक दिला आहे. एकदा पूर्ण चार्ज झाल्यावर ही कार 530km ची रेंज देऊ शकते, अशी अशा व्यक्त केली जात आहे. ही कार ड्युअल मोटर किंवा सिंगल मोटर व्हेरिएंटसह भिन्न पॉवर आउटपुटसह येऊ शकते. याच्या आणखी एका खास फीचर्सनुसार,  EV6 फक्त 18 मिनिटांत 10 ते 80 टक्के चार्ज होऊ. मात्र यासाठी डीसी चार्जरचा वापर करावा लागेल. 


इतर हायलाइट्समध्ये 6 रिजनरेटिव्ह ब्रेकिंग लेव्हल्स, 990 मिमी लेगरूमसह अधिक जागा, फ्लॅट फ्लोअर्स आणि दोन कर्व्ड 12.3 हाय-डेफिनिशन वाईल्ड-स्क्रीन, ऑगमेंटेड रिअॅलिटी HUD, 14-स्पीकर मेरिडियन सराउंड ऑडिओ सिस्टम, फ्लश डोअर हँडल्स आणि बरेच काही समाविष्ट आहे. EV6 ही एक प्रीमियम इलेक्ट्रिक कार असेल ज्याला सध्या कोणतेही प्रतिस्पर्धी नाहीत. EV6 अगदी नवीन इलेक्ट्रिक-ग्लोबल मॉड्यूलर प्लॅटफॉर्म (E-GMP) वर आधारित आहे. जे विशेषतः इलेक्ट्रिक वाहनांसाठी तयार करण्यात आले आहे. दरम्यान, या कराच्या फक्त 100 युनिट्स विकल्या जाणार असल्याने, भारतात या कारला कसा प्रतिसाद मिळतो हे पाहावं लागेल. 


इतर महत्वाच्या बातम्या: 





 




Review: नवीन फीचर्स आणि जबरदस्त लूकसह अशी आहे 'Nexon EV Max'


Tata Tiago: टाटाने आपल्या सर्वात स्वस्त कारच्या किंमतीत केली वाढ; जाणून घ्या मॉडेल आणि किंमत


Car loan Information:

Calculate Car Loan EMI