Nexon EV Max Review: प्रसिद्ध कार निर्माता कंपनी टाटा मोटर्स सध्या आपल्या इलेक्ट्रिक कारसाठी चर्चेत आहे. कंपनीच्या इलेक्ट्रिक कारला सर्वाधिक मागणी आहे. टाटाच्या इलेक्ट्रिक कार या भारतात सर्वाधिक विक्री होणाऱ्या इलेक्ट्रिक कार आहेत. अलीकडेच कंपनीने आपली नवीन इलेक्ट्रिक कार Nexon EV Max लॉन्च केली आहे. कंपनीने यात इतर इलेक्ट्रिक कारच्या तुलनेत काही नवीन फीचर्स दिले आहेत. याच कारबद्दल आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. 



Nexon EV Max मध्ये 40.5 kWh चा मोठा बॅटरी पॅक देण्यात आला आहे. 143PS/250 Nm पॉवरसह ही कार 437km ची रेंज देईल, असा कंपनीने दावा केला आहे. Standard Nexon EV मध्ये 312km रेंजसह 30.2kWh बॅटरी पॅक देण्यात आले आहे. Nexon EV MAX मध्ये कंपनीने आपल्या इतर इलेक्ट्रिक कारच्या तुलनेत अधिक पॉवर दिली आहे. यात तीन ड्राईव्ह मोड देण्यात आले आहे. याच्या स्पोर्ट मोडमध्ये ही कार तुम्हाला जबरदस्त गतीचा अनुभव देते. शहरात ही गाडी चालवताना तुम्ही सिटी किंवा इको मोडचा वापर करू शकता. या दोन्ही मोडमध्ये ही कार तुम्हाला अधिक रेंज देऊ शकते. Nexon EV आता कमी पॉवरमध्ये ही चांगली रेंज देईल. 

ARAI च्या 437km रेंजबद्दल केलेला दावा हा ग्राउंड रिअॅलिटीवर जरा वेगळा आहे. याची स्टँडर्ड Nexon EV 200km पर्यंत रेंज देते, तर Nexon EV Max जवळपास 300km ची रेंज देते. तुम्ही कोणत्या मोडमध्ये ही कार चालवता, यावरही कारची रेंज अवलंबून आहे. तसेच रस्ता किंवा अगदी हवामान परिस्थितीमुळे तुम्हाला मिळणारी रेंज वेगळी ही असू शकते. याच्या इको मोडमध्ये तुम्हाला 280/300km सहज रेंज मिळेल. 


यात अॅडजेस्टेबल रीजनरेटिव्ह ब्रेकिंग मिळते, जी रीजेनची पातळी बदलू शकते. तसेच शहरात ही कार चालवताना रेंज वाढवण्यास मदत करते. तुम्ही यात ब्रेक पेडलचा वापर न करताही एक-पेडल ड्रायव्हिंग करू शकता. याच्या मोठ्या बॅटरी पॅकमुळे याचे ग्राउंड क्लीयरन्स थोडे कमी झाले आहे. असं असलं तरीही तुमच्या ड्रायव्हिंगच्या अनुभवात कोणताही बदल होणार नाही. आम्ही या कारची ऑफ-रोडिंगवरही केली आहे. यावरही याची कामगिरी दमदार असून ऑफ-रोडिंगवर ही कार सहज धावते. कंपनीने या कारमधील बूट स्पेस कमी केले आहे. 


कंपनीने आपल्या Nexon EV Max मध्ये नवीन ड्युअल-टोन अलॉय व्हील, ड्युअल-टोन पर्यायांसह नवीन इंटेन्सी-टील रंग दिले आहे. इंटिरिअरला अधिक प्लश दिसणारे बेज अपहोल्स्ट्री मिळते, तर केबिनवर निळे हायलाइट्स देखील आहेत. फीचर अपडेट्समध्ये ऑटो होल्ड, वायरलेस चार्जिंग, एअर प्युरिफायर, क्रूझ कंट्रोल, कूल्ड सीट्स आणि कनेक्टेड कार तंत्रज्ञानासह पॉवर्ड हँड ब्रेकचा समावेश आहे. ही कार ड्रायव्हिंग करताना आमच्या लक्षात आले की आकर्षक रिव्हर्स टू ड्राईव्ह किंवा न्यूट्रलमध्ये काही अंतर आहे. तसेच यात देनाय्त आलेली टचस्क्रीन थोडी लहान आहे.


 


 


Car loan Information:

Calculate Car Loan EMI