Upcoming Kawasaki Sports Bike: जपानी प्रीमियम दुचाकी उत्पादक कंपनी कावासाकी लवकरच भारतीय बाजारपेठेत नवीन स्पोर्ट्स बाईक लॉन्च करणार आहे. कंपनी लवकरच नवीन अपडेट्ससह Versys 650 लॉन्च करण्याची घोषणा करू शकते. कंपनी सध्या आपल्या Versys 650 व्हेरिएंटवर मोठी सूट देत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही आगामी बाईक या महिन्याच्या अखेरीस लॉन्च केली जाऊ शकते. असे मानले जाते की, या आगामी मॉडेल Versys 650 ची किंमत सध्याच्या मॉडेलपेक्षा सुमारे 50,000 रुपये जास्त असू शकते. याशिवाय बाईक काही नवीन फीचरसह अपडेट देखील केली जाईल. यातच फोर-वे- अॅडजस्टेबल विंडस्क्रीन, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह टीएफटी डिस्प्ले आणि दोन-स्तरीय ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टम, यात मिळू शकतो.
इंजिन
या नवीन बाईकमध्ये ग्राहकांना 649cc, पॅरलल-ट्विन इंजिन पाहायला मिळेल. हे इंजिन 66bhp ची कमाल पॉवर आणि 61Nm चा पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. कलर ऑप्शन्सबद्दल बोलायचे झाले तर या आगामी मोटरसायकलमध्ये नवीन कलर ऑप्शन्स देखील देण्यात आले आहेत.
नवीन Versys 650 बाईकमध्ये 17-इंच अलॉय व्हील आणि पुढील बाजूस अपसाइड-डाउन फोर्क आणि मागील बाजूस मोनोशॉक वापरण्यात आले आहे. यासोबतच दोन्ही टायरमध्ये डिस्क ब्रेक उपलब्ध असतील. याशिवाय, ड्युअल-पॉड हेडलॅम्प सेटअप, सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, 21-लिटर इंधन टाकी आणि अॅडजस्टेबल विंडस्क्रीन ग्राहकांना यात मिळतील.
जुन्या मॉडेलवर 70 हजारांची सूट
सध्या बाजारात विक्रीसाठी असलेल्या Versys 650 च्या जुन्या मॉडेलची किंमत 7.15 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. दुसरीकडे नवीन Versys 650 ची किंमत 7.50 ते 7.60 लाख रुपये (एक्स-शोरूम) दरम्यान असण्याची शक्यता आहे. कंपनी जुन्या मॉडेलवर 70,000 रुपयांची विशेष सूट देत आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Hyundai Venue Facelift लवकरच भारतात होणार लॉन्च; पाहा याचे जबरदस्त फीचर्स
- Kia Sonet कारला टक्कर देण्यासाठी येतेय Citroen C3! जूनमध्ये लॉंच होण्याची शक्यता
- Tata Nexon ची बंपर विक्री, आता नंबर 1 पासून फक्त दोन पावले दूर
Car loan Information:
Calculate Car Loan EMI