Most Expensive Bikes In India: जर तुम्हाला महागड्या बाईक्सची आवड असेल, तर भारतात विकल्या जाणार्‍या 10 सर्वात महागड्या बाईक्सबद्दल जाणून घेतलेच पाहिजे. यामध्ये Kawasaki Ninja H2R, BMW M 1000 RR, Indian Roadmaster आणि Honda Goldwing Tour सारख्या बाईक्स समावेश आहे.


Kawasaki Ninja H2R


कावासाकी निन्जा (Kawasaki Ninja H2R) ही भारतात सर्वात जास्त सर्च केली जाणारी बाईक आहे. भारतात विकल्या जाणाऱ्या सर्वात महागड्या बाईक्समध्ये ही येते. भारतात या बाईकची किंमत जवळपास 80 लाख रुपये आहे.


BMW M 1000 RR


BMW M 1000 RR, BMW कार प्रमाणे BMW बाईकची तरूणांमध्ये खूप क्रेझ आहे. या बाईकची किंमत सुमारे 42 ते 45 लाख आहे. त्याचा टॉप स्पीड 299kmph आहे. BMW M 1000 RR चा लक्झरी आणि स्पोर्टी लुक त्याला खास बनवतो.


Indian Roadmaster


महागड्या बाईकमध्ये आणि क्रूझर बाईकच्या शौकीनांमध्ये इंडियन रोडमास्टरला (Indian Roadmaster) जास्त मागणी आहे. याचा वेगळा फॅन क्लब भारतात आहे. भारतात या क्रूझर बाईकची किंमत जवळपास 43 लाख रुपये आहे.


Honda Goldwing Tour


होंडाच्या बाईक भारताच्या प्रत्येक व्यक्तीला माहीत आहेत. होंडा गोल्ड विंग टूर (Honda Goldwing Tour) मध्ये 1833cc इंजिन देण्यात आले आहे. भारतात बाईकची किंमत सुमारे 37 लाख रुपयांपासून सुरू होते.


Harley Davidson Road Glide Special


हार्ले-डेव्हिडसन (Harley Davidson) बाईक दिसायला बरीच मस्क्युलर आहे. इतकंच नाही, तर ही सर्वात आरामदायक बाईक आहे. भारतात त्याची किंमत जवळपास 35 लाख रुपये आहे.


Indian Chieftain Dar Horse


Indian Chieftain Dar Horse किंमत सुमारे 33.29 लाख रुपयांपासून सुरू होते. यात एक मजबूत इन्फोटेनमेंट सिस्टम देखील आहे.


Honda CBR1000RR-R


Honda CBR1000RR-R चे इंजिन 999cc आहे. यात अनेक उत्तम फीचर्स आहेत. भारतात त्याची किंमत 32.64 लाख रुपयांपासून सुरू होते.


Indian Springfield


इंडियन स्प्रिंगफील्डची किंमत सुमारे 33.06 लाख रुपये आहे. 1890cc इंजिन असण्यासोबतच यात अनेक खास फीचर्स देखील आहेत.


Harley-Davidson Street Glide Special


हार्ले डेविडसन (Harley-Davidson) बाईक 1868cc इंजिनसह येते. यात ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी सपोर्टसह 6.5-इंच कलर टीएफटी स्क्रीन देखील आहे. भारतात त्याची किंमत जवळपास 31.99 लाख रुपये आहे.


Harley-Davidson Road King


हार्ले-डेव्हिडसन रोड किंग (Harley-Davidson Road King) इंजिन 1746cc आहे. भारतात या बाईकची किंमत जवळपास 26.99 लाख रुपये आहे. यात अनेक उत्तम वैशिष्ट्ये आहेत.


हेही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha



Car loan Information:

Calculate Car Loan EMI