Kia Seltos vs Hyundai Creta : जर तुम्ही 10 लाख रुपयांपर्यंत एसयूव्ही कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्या मनात Kia Seltos आणि Hyundai Creta या दोन एसयूव्हीची नावे नक्कीच आली असतील. मात्र या दोन्ही कारमध्ये कोणती कार आहेत बेस्ट? हे आज आम्ही तुम्हाला या बातमीद्वारे सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊ या दोन्ही कारचे तुलनात्मक स्पेसिफिकेशन. 


किती मिळेल मायलेज?  


या दोन्ही एसयूव्हीचे मायलेज किती आहे, हे आपण  सर्वात आधी जाणून घेणार आहोत. Hyundai चा दावा आहे की, ग्राहकांना Hyundai Creta मध्ये 16.8 किमी प्रतितास मायलेज मिळेल. Kia Seltos ही एसयूव्ही Hyundai Creta पेक्षा अधिक मायलेज देते. किआचा दावा आहे की, सेल्टोस 20.8 किमी प्रतितास इतका मायलेज देते. 


कोणाचे इंजिन आहे अधिक दमदार? 


Hyundai Creta मध्ये ग्राहकांना 1497 सीसीचे इंजिन मिळणार आहे. हे इंजिन 1.5 लिटर नॅच्युरल अॅस्पिरेटेड पेट्रोल इंजिन आहे. जे 155 पीएस पॉवर आणि 144 एनएम ट्रॉर्क जनरेट करते. हे इंजिन 6-स्पीड मॅनुअल गिअरबॉक्ससह येते. असं असलं तरी Creta चे इंजिन देखील यापेक्षा अधिक वेगळे नाही. Hyundai Creta मध्ये ग्राहकांना 1.5 लिटरचे पेट्रोल इंजिन मिळेल. हे इंजिन देखिल 6-स्पीड मॅनुअल गिअरबॉक्ससह येते.         


फीचर्स 


Hyundai Creta मध्ये ग्राहकांना 10.25-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम मिळेल. कंपनी यामध्ये पॅनोरामिक सनरूफ, वायरलेस चार्जिंग, कार कनेक्टिव्हिटी सर्व्हिस सारखे फीचर्स दिले आहेत. तर दुसरीकडे Kia Seltos च्या फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, ग्राहकांना यात 10.25-इंचाची टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम मिळेल. सोबतच 360 डिग्री कॅमेरा, हॅन्ड अप डिस्प्ले, पॉवर एअरबॅग आणि पार्किंग सेन्सर सारखे फीचर्स मिळतील.  
 
किंमत किती?    


Hyundai Creta ची प्रारंभिक किंमत 10.16 लाख रुपये आहे. तर याच्या टॉप मॉडेलची किंमत 17.87 लाख रुपये आहे. तसेच Kia Seltos ची प्रारंभिक किंमत 9.95 लाख रुपये आहे. जी याच्या टॉप मॉडेल प्रमाणे 18.10 लाख रुपयांपर्यंत जाते.   


संबंधित बातम्या : 



Car loan Information:

Calculate Car Loan EMI