नवी दिल्ली : Reliance BP Mobility Limited (RBML) अंतर्गत कार्यरत असलेल्या Jio-bp आणि Mahindra Group ने इलेक्ट्रिक वाहनांची उत्पादने आणि त्यांच्या सेवांच्या निर्मितीसह कमी कार्बन आणि पारंपारिक इंधनांमध्ये समन्वय राखण्यासाठी एका नॉन-बाइंडिंग सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे.


या सामंजस्य करारामध्ये महिंद्राच्या इलेक्ट्रिक 3 आणि 4 चाकी वाहनांसाठी, क्वाड्रिसायकल आणि ई-SCV (लहान व्यावसायिक वाहने – 4 टन कमी) सह महिंद्राच्या वाहनांसाठी Jio-bp द्वारे मूल्यमापन केलेल्या चार्जिंग सोल्यूशन्सचा समावेश आहे. यामध्ये महिंद्रा ग्रुपच्या कॅप्टिव्ह फ्लीट्स आणि लास्ट-माईल मोबिलिटी वाहनांचा समावेश असेल.


या दोन्हा कंपन्यांनी काढलेल्या संयुक्त निवेदनात म्हटले आहे की, इलेक्ट्रिक  वाहन उत्पादने आणि सेवांच्या क्षेत्रात दोन्ही कंपन्यांच्या सामर्थ्याचा लाभ घेण्याचे या भागीदारीचे उद्दिष्ट आहे. महिंद्रा समूह आणि त्यांचे भागीदार असेल्या चॅनेलच्या स्थानांचे मूल्यमापन Jio-bp मोबिलिटी स्टेशन्स, इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग आणि स्वॅपिंग पॉइंट्सच्या स्थापनेसाठी केले जाईल.  
  
Jio-bp ने नुकतेच महाराष्ट्रातील पहिले मोबिलिटी स्टेशन लाॅं केले आहे. ज्यामध्ये इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंगसह इतर इंधनावर चालणाऱ्या वाहनांसाठीही इंधन भरता येणार आहे. हे मोबिलिटी स्टेशन जागतिक दर्जाचा किरकोळ विक्रिचा अनुभव देईल.  


 महिंद्रा ग्रुपने तयार केलेल्या वाहनांच्या चार्जिंग सुविधेसाठी अशा एका बिझनेस मॉडेलचाही  Jio-bp शोध घेत आहे, ज्यामध्ये मोबिलिटी सेवा आणि बॅटरी चार्ज करण्यासारख्या सेवा देता येतील. 


इलेक्ट्रिक वाहनांचे मार्केट भारतात अजूनही पहिल्याच टप्यात आहे. या सामंजस्य कराराद्वारे डेटाबेस, ऑपरेशन्स सपोर्ट सिस्टम, सॉफ्टवेअर, पायलट आणि व्यावसायिक स्तरावरील व्यवसाय मॉडेलसह चार्जिंग आणि स्वॅपिंग सुविधांचे प्रकार शोधून त्यांची अंमलबजावणी करण्याचा प्रस्ताव आहे.  उच्च कार्यक्षमता आणि बदलता येणाऱ्या बॅटरीसर इलेक्ट्रिक वाहनांच्या आदानप्रदानातील गती वाढविणे यासाठी ही भागीदारी मदत करणार आहे. 


जीओ-बीपीने शोधून काढलेल्या उपायांमुळे ग्राहकांना उत्तम सुविधा मिळतील. शिवाय ग्राहक आपल्या जवळच्या चार्जिंग पॉईंटवरून अत्यंत कमी मोबदल्यात आपली बॅटरी चार्जिंग करू शकतील. दोन्ही कंपन्यांच्या विस्तारासाठी हे उपाय महत्वाचे ठरतील. शिवाय वाढता कार्बन कमी करण्याचे भारताचे उदिष्ट पूर्ण होईल. 


इतर महत्वाच्या बातम्या


CDS Bipin Rawat Death News Live : हेलिकॉप्टर क्रॅशमध्ये बिपीन रावत यांचे निधन


Bipin Rawat : हेलिकॉप्टर अपघातात सीडीएस जनरल बिपीन रावत यांच्यासह 13 जणांचा मृत्यू, जाणून घ्या संपूर्ण घटनाक्रम


 


Car loan Information:

Calculate Car Loan EMI