CDS Bipin Rawat Death News Live : पंतप्रधान मोदींकडून जनरल बिपीन रावत यांना श्रद्धांजली

CDS Bipin Rawat Death News Live : लष्कराच्या हेलिकॉप्टरचा भीषण अपघात झाला आहे. कर्नाटकातील उटीजवळ (Ooty) हेलिकॉप्टर क्रॅश (Army chopper crashe) झालं.

abp majha web team Last Updated: 09 Dec 2021 09:09 PM
पंतप्रधान मोदींकडून जनरल बिपीन रावत यांना श्रद्धांजली

तामिळनाडूमध्ये झालेल्या दुर्दैवी अपघातात जनरल बिपीन रावत आणि इतर 12 जणांचा दुर्दैवी अपघात झाला होता. आज पालम विमानतळावर त्यांचं पार्थिव दाखल झालं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि अजित डोवाल यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. 

बिपीन रावत यांच्यासह 12 जणांचे पार्थिव  पालम विमानतळावर दाखल

बिपीन रावत यांच्यासह 12 जणांचे पार्थिव  पालम विमानतळावर दाखल झाले आहे

सीडीएस बिपीन रावत यांच्या मृतदेहाची ओळख पटली

सीडीएस बिपीन रावत यांच्यासह  13 जणांचं हेलिकॉप्टर दुर्घटनेत निधन झालंय. जनरल बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांचं पार्थिव वेलिंग्टनमधील रुग्णालयातून आता दिल्लीकडे नेण्यात येणार आहे. जनरल बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांच्या मृतदेहाची ओळख पटली आहे.  सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत तीन मृतदेहाची ओळख पटली आहे. या तीन मृतदेहामध्ये जनरल बिपीन रावत आणि पत्नी मधुलिका रावत यांचा समावेश आहे. या दोघांव्यतिरिक्त ब्रिगेडिअर एलएस लिड्डर यांच्या मृतदेहाची देखील ओळख पटली आहे

ही खूप दु:खद घटना आहे - अनिल देसाई 

ही खूप दु:खद घटना आहे. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत यांच्यासह अनेकांचे निधन झालंय. या घटनेची चौकशी संरक्षण विभाग करत आहेच. परंतु पंतप्रधान,राष्ट्रपतीसह अनेक अतिमहत्वाच्या व्यक्ती अशा हेलिकॉप्टरमधून प्रवास करतात. त्यामुळं हे गंभीर आहे.

CDS Bipin Rawat Death Pm Modi Reaction : रावत यांची सेवा भारत कधीच विसरणार नाही - पंतप्रधान नरेंद्र मोदी

हवाई दलाच्या IAF MI 17 हेलिकॉप्टरच्या भीषण अपघातात सीडीएस जनरल बिपीन रावत यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर अनेकांनी शोक व्यक्त केला असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील ट्वीट करत रावत यांची सेवा भारत कधीच विसरणार नाही असं म्हटलं आहे. 


CDS Bipin Rawat Death Home Minister Amit Shah Reaction : बिपीन रावत यांच्या मृत्यूवर गृहमंत्र्यांनी व्यक्त केलं दु:ख

हवाई दलाच्या IAF MI 17 हेलिकॉप्टरच्या भीषण अपघातात सीडीएस जनरल बिपीन रावत यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या निधनानंतर सर्व स्तरातून दु:ख व्यक्त होत असून गृहमंत्री अमित शाह यांनीही ट्वीट करत श्रद्धांजली वाहिली आहे. 


सीडीएस बिपीन रावत यांच निधन

भारतीय वायुसेनेच्या हेलिकॉप्टरला झालेल्या अपघातात चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपीन रावत यांचा मृत्यू झाला आहे. भारतीय हवाई दलाच्या अधिकृत ट्वीटर हँडलवरुन याबबतची माहिती देण्यात आली आहे.



 

हेलिकॉप्टर क्रॅश प्रकरणी मोदींच्या उपस्थितीत कॅबिनेटच्या सुरक्षा समितीची 6.30 वाजता बैठक

तामिळनाडूमध्ये सीडीएस जनरल बिपीन रावत यांना घेऊन जाणाऱ्या भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टरचा अपघात झाला आहे. या हेलिकॉप्टरमध्ये लष्कराचे एकूण 14 जण होते, त्यापैकी 13 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती एएनआयने त्यांच्या ट्वीटमध्ये दिली आहे. यावर आता कॅबिनेटच्या सुरक्षा समितीने संध्याकाळी 6.30 वाजता बैठक बोलावली आहे. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत.

CDS Bipin Rawat Helicopter Crash : हेलिकॉप्टर अपघातात 14 पैकी 13 जणांचा मृत्यू, सूत्रांची माहिती

भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टरचा भीषण अपघात झाला आहे. कर्नाटकातील उटीजवळ (Ooty) हेलिकॉप्टर क्रॅश (Army chopper crashe) झालं.  या अपघातात 14 पैकी 13 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिल्याचे एएनआयच्या ट्वीटमध्ये म्हटले आहे. मृत्यू झालेल्यांची ओळख अद्याप पटलेली नाही. DNA  अहवालानंतर मृतांची ओळख पटवली जाणार आहे.


 





CDS Bipin Rawat Helicopter Crash Live : लष्कर प्रमुख मनोज नरवणे आणि संरक्षण मंत्र्यांमध्ये बैठक

लष्कर प्रमुख मनोज नरवणे आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यामध्ये बैठक सुरु झाली आहे. थोड्याच वेळात राजनाथ सिंह संसदेत निवेदन देणार आहेत. त्यामुळे त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही माहिती दिली. कर्नाटक-तामिळनाडू सीमेवर कुन्नूरजवळ हवाईदलाच्या  हेलिकॉप्टरचा भीषण अपघात झाला आहे. यामध्ये 14 जण प्रवास करत होते. यामध्ये संरक्षण दलाचे प्रमुख जनरल बिपीन रावतदेखील या हेलिकॉप्टरमधून प्रवास करत होते.  

दुर्घटनेत आठ जणांचा मृत्यू, तामिळनाडूच्या वनमंत्र्यांची माहिती

अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला आहे. तीन जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे, तामिळनाडूच्या वनमंत्र्यांनी ही माहिती दिली आहे.  

TN Helicopter Crash : थोड्याच वेळात राजनाथ सिंह संसदेत निवेदन देणार

थोड्याच वेळात संरक्षणमंत्री राजनाथ सिंह संसदेत निवेदन देणार आहेत.  भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टरचा भीषण अपघाताबाबत माहिती देणार आहेत या अपघातामध्ये 11 जणांचा मृत्यू झाला आहे. कर्नाटकातील उटीजवळ  हेलिकॉप्टर क्रॅश झालं आहे.

PHOTO : ऊटीजवळील जंगलात हेलिकॉप्टर कोसळलं, पाहा दुर्घटनेचे भीषण फोटो



फोटो पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

CDS Bipin Rawat Helicopter crash : दोन इंजिन, अतिशय सुरक्षित, तरीही हेलिकॉप्टर कसं कोसळलं, नेमकं कारण काय?

Tamil Nadu Chopper Crash : बंगळुरु  : कर्नाटक-तामिळनाडू सीमेवर कुन्नूरजवळ हवाईदलाच्या हेलिकॉप्टरचा भीषण अपघात झाला आहे. कर्नाटकातील उटीजवळ (Ooty) हेलिकॉप्टर क्रॅश (Helicopter crashed) झालं. महत्त्वाचं म्हणजे या हेलिकॉप्टरमध्ये सीडीएस जनरल बिपीन रावत (Bipin Rawat) यांचा समावेश असल्याची माहिती आहे. या हेलिकॉप्टरमध्ये लष्कराचे चार उच्च अधिकारी होते. यापैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे. तामिळनाडूतील कुन्नूरजवळ निलगिरी कट्टेरी (Niligiri Katteri) ही दुर्घटना घडली. आर्मी ट्रेनिंग कॅम्पच्या परिसरात हेलिकॉप्टर क्रॅश झाल्यानंतर, तातडीने बचावकार्याला सुरुवात झाली आहे. 


सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

CDS Bipin Rawat Helicopter Crash : हेलिकॉप्टर कसं, कुठे आणि कधी कोसळलं? पहिला व्हिडीओ

CDS General Bipin Rawat Helicopter Crash Ooty : भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टरचा भीषण अपघात झाला आहे. कर्नाटकातील उटीजवळ (Ooty) हेलिकॉप्टर क्रॅश (Helicopter Crash) झालं. महत्त्वाचं म्हणजे या हेलिकॉप्टरमध्ये सीडीएस जनरल बिपीन रावत यांचा समावेश असल्याची माहिती आहे. या हेलिकॉप्टरमध्ये लष्कराचे चार उच्च अधिकारी होते. यापैकी तिघांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगण्यात येत आहे. कर्नाटकातील कुन्नूरजवळ निलगिरी कट्टेरी (Niligiri Katteri) ही दुर्घटना घडली. आर्मी ट्रेनिंग कॅम्पच्या परिसरात हेलिकॉप्टर क्रॅश झाल्यानंतर, तातडीने बचावकार्याला सुरुवात झाली आहे. या हेलिकॉप्टर अपघाताची 'कोर्ट ऑफ इन्क्वायरी' करण्यात येणार आहे. सीडीएस जनरल बिपीन रावत यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरू असल्याची माहिती माजी संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी दिली. 


दिल्लीत केंद्रीय मंत्रिमंडळाची आपात्कालीन बैठक; NSA अजित डोवलही उपस्थित

दिल्लीत केंद्रीय मंत्रिमंडळाची आपात्कालीन बैठक होत असून राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवलही उपस्थित असल्याचे वृत्त. 

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी हेलिकॉप्टर अपघाताबाबत पंतप्रधान मोदींना दिली माहिती

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी हेलिकॉप्टर अपघाताबाबत पंतप्रधान मोदींना माहिती दिली. 

सीडीएस जनरल बिपीन रावत यांना उच्चस्तरीय वैद्यकीय उपचार द्या; तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांचे आरोग्य सचिवांना आदेश

 सीडीएस जनरल बिपीन रावत आणि इतरांवर उच्चस्तरीय वैद्यकीय उपचार करा; तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांचे आरोग्य सचिवांना आदेश

Tamil Nadu Chopper Crash: संरक्षण मंत्री लोकसभेत माहिती देणार

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे लोकसभेत या अपघाताबाबत माहिती देणार असल्याचे वृत्त आहे. यावेळी अपघाताबाबत सविस्तर माहिती देशाला देतील. 

CDS Bipin Rawat Chopper Crash Live Update : दुर्घटनेसंदर्भातील प्रत्येक अपडेट्स मिळवण्यासाठी पाहा एबीपी लाईव्ह

Tamil Nadu Chopper Crash: दिल्लीला परतत असताना कुन्नुरला पोहोचण्यापूर्वीच हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त

Coonoor Helicoptor Crash : सीडीएस जनरल बिपीन रावत रुग्णालयात दाखल, उपचार सुरु

सीडीएस जनरल बिपीन रावत यांना सध्या रुग्णालयात दाखल केल्याची माहिती मिळत आहे. अपघातात ते जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. 





दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टरमध्ये CDS जनरल बिपिन रावतांसह इतरही वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश, वेलिंग्टनला कार्यक्रमासाठी निघाले होते

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हवाई दलाच्या सुलूर बेसवरुन वेलिंग्टन येथील डिफेन्स सर्विसेस कॉलेजमध्ये (Defence Services College (DSC)) हे सर्व वरिष्ठ अधिकारी निघाले होते. 

अपघातग्रस्त हेलिकॉप्टरमधून कोण प्रवास करत होते?

सीडीएस जनरल बिपीन रावत, त्यांची पत्नी मधुलिखा रावत, ब्रिगेडियर एल. एस. लिडेर, लेफ्टिनेंट कर्नल हरजिंदर सिंह, एन.के. गुरसेवक सिंह, एन.के. जितेंद्र कुमार,  L/NK विवेक कुमार, L/NK बी. तेजा, हवालदार सतपाल आदी या हेलिकॉप्टरमधून प्रवास करत होते. 

घटनास्थळी बचावकार्य सुरु, अपघाताचं ठिकाण डोंगराळ भागामध्ये असल्यानं बचावकार्यात अडथळे

लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह संरक्षण दलाचे प्रमुख जनरल बिपीन रावत आणि त्यांचे कुटुंबीय या Mi- 17V5 हेलिकॉप्टरमधून प्रवास करत होते. हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाल्यानंतर त्याला आग लागली. घटनास्थळी बचावकार्य सुरु करण्यात आलं असून स्थानिकदेखील मदत करत आहेत. मात्र अपघात झालेलं ठिकाण डोंगराळ भागामध्ये असल्याने तिथे पोहचण्यास अडचणी येत आहेत.

अपघाताचे कारण शोधण्यासाठी चौकशीचे आदेश : भारतीय हवाई दल

CDS जनरल बिपिन रावत हे IAF Mi-17V5 हेलिकॉप्टरनं प्रवास करत होते. त्यांच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला असून तामिळनाडूच्या कुन्नूरजवळ आज अपघात झाला आहे. अपघाताचे कारण शोधण्यासाठी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती भारतीय हवाई दलाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन देण्यात आली आहे. 





हेलिकॉप्टरमधून 10 प्रवासी प्रवास करत असल्याची माहिती

तमिळनाडूतील कुन्नूर येथे सैन्याचं हेलिकॉप्टर दुपारी 12.40 वाजता क्रॅश झालं आहे. हेलिकॉप्टरमधून सीडीएस बिपीन रावतही प्रवास करत असल्याची माहिती. हेलिकॉप्टरमधून 10 प्रवासी प्रवास करत असल्याची माहिती, 4 गंभीर जखमी. क्रॅश झाल्यानंतर हेलिकॉप्टरला आग, घटनास्थळी रेस्क्यू ऑपरेशन सुरु

हेलिकॉप्टर नेमकं कसं दुर्घटनाग्रस्त झालं, याबाबत माहिती नाही

हेलिकॉप्टर नेमकं कसं दुर्घटनाग्रस्त झालं त्याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही. या हेलिकॉप्टरमध्ये दहा जण प्रवास करत होते. त्यापैकी तीन जण गंभीर जखमी आहेत. या घटनेची माहिती समजताच जिल्हाधिकारी आणि लष्कराचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. घटनास्थळी सहा रुग्णवाहिका दाखल झाल्या आहेत. हेलिकॉप्टरमध्ये सीडीएस जनरल बिपीन रावत यांच्यासह त्यांचे कुटुंबीय आणि मदतनीस होते अशी माहिती समोर येत आहे. हेलिकॉप्टरचा अपघात झाला तेव्हा त्यात 10 जण होते. 





 


दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टरमध्ये CDS बिपिन रावत असल्याची माहिती

लष्कराच्या हेलिकॉप्टरचा भीषण अपघात झाला आहे. कर्नाटकातील ऊटीजवळ हेलिकॉप्टर क्रॅश झालं. महत्त्वाचं म्हणजे या हेलिकॉप्टरमध्ये सीडीएस जनरल बिपीन रावत यांचा समावेश असल्याची माहिती आहे. 





ऊटीमध्ये लष्कराचे हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त

लष्कराच्या हेलिकॉप्टरचा भीषण अपघात झाला आहे. कर्नाटकातील उटीजवळ (Ooty) हेलिकॉप्टर क्रॅश (Army chopper crashe) झालं. महत्त्वाचं म्हणजे या हेलिकॉप्टरमध्ये सीडीएस जनरल बिपीन रावत यांचा समावेश असल्याची माहिती आहे. या हेलिकॉप्टरमध्ये लष्कराचे चार उच्च अधिकारी होते. यापैकी तिघांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगण्यात येत आहे. कर्नाटकातील कुन्नूरजवळ निलगिरी कट्टेरी (Niligiri Katteri) ही दुर्घटना घडली. आर्मी ट्रेनिंग कॅम्पच्या परिसरात हेलिकॉप्टर क्रॅश झाल्यानंतर, तातडीने बचावकार्याला सुरुवात झाली आहे. 

पार्श्वभूमी

Indian Army Chopper Crash : CDS Bipin Rawat Death : तामिळनाडूच्या कुन्नूरजवळ झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात प्राण गमावणारे देशाचे पहिले सीडीएस जनरल बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका यांच्या पार्थिव देहावर शुक्रवारी 10 डिसेंबर रोजी दिल्ली कॅन्टोन्मेंटमध्ये अंत्यसंस्कार केले जातील. जनरल जनरल रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका यांचं पार्थिव आज मिलिट्री विमानानं दिल्लीला आणलं जाणार आहे. शुक्रवारी जनरल रावत यांचं पार्थिव दर्शनासाठी ठेवलं जाईल. सकाळी 11 वाजेपासून दुपारी 2 वाजेपर्यंत त्यांच्या पार्थिवाला सलामी देण्यासाठी ठेवलं जाईल. त्यानंतर त्यांच्या अंतिम संस्काराची तयारी केली जाणार आहे. दिल्लीच्या कॅन्टॉन्मेंटमधील ब्रार स्क्वायर स्मशानभूमीत त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडतील. कर्नाटक-तामिळनाडू सीमेवर कुन्नूरजवळ हवाईदलाच्या अत्यंत सुरक्षित समजल्या जाणाऱ्या IAF MI 17 हेलिकॉप्टरचा भीषण अपघात झाला. या हेलिकॉप्टरमध्ये सीडीएस जनरल बिपीन रावत (Bipin Rawat) यांच्यासह 14 जणांचा मृत्यू झाला. 


बिपीन रावत यांना दोन मुली


बिपीन रावत आणि मधुलिका रावत  यांना दोन मुली आहे. एका मुलीचे नाव कृतिका रावत आहे. बिपीन रावत यांचे वडील लक्ष्मण सिंह देखील सैन्य दलात होते. 


कोण होते सीडीएस जनरल बिपीन रावत



  • 2016 साली बिपीन रावत हे लष्करप्रमुख झाले. लष्करप्रमुख दलबीरसिंह सुहाग 31 डिसेंबर 2016ला सेवानिवृत्त झाले होते, त्यांच्या जागी रावत यांची नेमणूक करण्यात आली होती. 

  • बिपीन रावत हे मूळचे उत्तराखंडचे आहेत. त्यांची 1 सप्टेंबर 2016 रोजीच सेनेच्या उपप्रमुखपदी नियुक्ती झाली होती.

  • बिपीन रावत यांचे वडिलही नि. लेफ्टनंट जनरल एल एस रावत हे सेनेच्या उपप्रमुखपदावर निवृत्त झाले होते.

  • रावत हे डिसेंबर 1978 मध्ये भारतीय सैन्य अकादमीतून पासआऊट झालेले 'बेस्ट कॅडेट' ठरले. 

  • रावत यांना 'स्वार्ड ऑफ ऑनर' या पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलं.

  • सेवा मेडल, युद्ध सेवा मेडल, सेना मेडल आणि विशिष्ट सेवा मेडल सारख्या अनेक पुरस्कारांनी रावत यांना गौरवण्यात आलं आहे.


नेमकी दुर्घटना कशी घडली?


लष्कराच्या बड्या अधिकाऱ्यांना घेऊन  हवाई दलाचं IAF Mi-17V5 हेलिकॉप्टर कर्नाटक-तामिळनाडू सीमेवरील कुन्नूरकडे जात होतं. यामध्ये सीडीएस बिपीन रावत, त्यांची पत्नी, त्यांचा स्टाफसह भारतीय सैन्यदलातील बडे अधिकारी होते. जवळपास 14 जण या हेलिकॉप्टरमधून प्रवास करत होते.  मात्र दुपारी साडेबाराच्या सुमारास खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झालं.  या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले. सर्व जखमींना जवळच्या आर्मी बेस कॅम्प परिसरातील रुग्णालयात उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.   


प्राथमिक माहितीनुसार, बिपीन रावत हे आपल्या पत्नीसह वेलिंगटन इथे एका कार्यक्रमासाठी जात होते. त्यावेळी त्यांच्यासोबत लष्कराचे वरिष्ठ अधिकारीही सोबत होते. वेलिंगटनमध्ये आर्मीचं कॉलेज आहे. या कॉलेजमध्ये सीडीएस बिपीन रावत यांचं लेक्चर नियोजित होतं.  वेलिंगटनवरुन कुन्नूरला जाताना हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झालं.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.