बंगळुरु/नवी दिल्ली : हवाईदलाचं हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या दुर्घटनेत देशाने संरक्षण दलाचा प्रमुख गमावला आहे. हेलिकॉप्टर दुर्घटनेत चीफ ऑफ डिफेन्स अर्थात CDS जनरल बिपीन रावत (Bipin Rawat death) यांचा मृत्यू झाला. जनरल बिपीन रावत यांच्यासह त्यांची पत्नी मधुलिका (Madhulika Rawat) आणि हेलिकॉप्टरमधील 13 जणांनी प्राण गमावले. यामध्ये भारतीय लष्करातील बड्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. कर्नाटक-तामिळनाडू सीमेवर कुन्नूरजवळ निलगिरी कट्टेरी (Niligiri Katteri) इथं 8 डिसेंबरला दुपारी साडेबाराच्या सुमारास हवाईदलाच्या हेलिकॉप्टरचा भीषण अपघात झाला. कर्नाटकातील उटीजवळ (Ooty) तामिळनाडूच्या सीमेवरील निलगिरी जंगलात हेलिकॉप्टर क्रॅश (Helicopter crashed) होऊन ही भीषण दुर्घटना घडली.


दोन इंजिन असलेलं IAF Mi-17V5 हे हेलिकॉप्टर अतिशय सुरक्षित समजलं जातं. पण तरीही हे हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाल्याने, त्याबाबतच्या सुरक्षेबाबत पुन्हा नव्याने चर्चा सुरु झाली आहे.  हे हेलिकॉप्टर रशियन बनावटीचं आहे. सैन्य दल आणि व्हीआयपींसाठी हे हेलिकॉप्टर मुख्यत्वे वापरलं जातं.  मात्र हे सुरक्षित हेलिकॉप्टर कोसळून दुर्घटना घडली.  


अपघाताची भीषणता 
दरम्यान हा अपघात इतका भीषण होता की ज्या जंगलात हे हेलिकॉप्टर कोसळलं, तिथली झाडं अक्षरश: आगीने जळून गेली. हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर आगीच्या ज्वाळा पसरल्या. झाडं अर्धवट तुटली होती. काही झाडं आगीच्या ज्वाळांनी पेटली.  


DNA चाचणीने मृतदेहांची ओळख
दरम्यान, या अपघातानंतर हेलिकॉप्टरने पेट घेतला. त्यामुळे हेलिकॉप्टरमधून प्रवास करणारे सर्वजण आगीच्या भक्षस्थानी पडले. त्यामुळे या मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी DNA चाचणी करण्यात येणार असल्याची माहिती, प्रशासनाने दिली.  


नेमकी दुर्घटना कशी 
लष्कराच्या बड्या अधिकाऱ्यांना घेऊन  हवाई दलाचं IAF Mi-17V5 हेलिकॉप्टर कर्नाटक-तामिळनाडू सीमेवरील कुन्नूरकडे जात होतं. यामध्ये सीडीएस बिपीन रावत, त्यांची पत्नी, त्यांचा स्टाफसह भारतीय सैन्यदलातील बडे अधिकारी होते. जवळपास 14 जण या हेलिकॉप्टरमधून प्रवास करत होते.  मात्र दुपारी साडेबाराच्या सुमारास खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झालं.  या अपघातात सुरुवातीला तीन जण गंभीर जखमी झाले. सर्व जखमींना जवळच्या आर्मी बेस कॅम्प परिसरातील रुग्णालयात उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र या दुर्घटनेत आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे.   


प्राथमिक माहितीनुसार, बिपीन रावत हे आपल्या पत्नीसह वेलिंगटन इथे एका कार्यक्रमासाठी जात होते. त्यावेळी त्यांच्यासोबत लष्कराचे वरिष्ठ अधिकारीही सोबत होते. वेलिंगटनमध्ये आर्मीचं कॉलेज आहे. या कॉलेजमध्ये सीडीएस बिपीन रावत यांचं लेक्चर नियोजित होतं.  वेलिंगटनवरुन कुन्नूरला जाताना हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झालं. 


घनदाट जंगलात हेलिकॉप्टर कोसळलं  


कुन्नूरजवळ निलगिरी जंगल हे अतिशय घनदाट जंगल आहे. चारीबाजूंनी झाडांनी व्यापलेल्या या परिसरात सीडीएस बिपीन रावत यांचं हेलिकॉप्टर कोसळलं. हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाल्यानंतर परिसरात आगीच्या ज्वाळा दिसू लागल्या.  तामिळनाडू आणि कर्नाटक या दोन राज्यांची सीमा निलगिरी जंगलालगत आहेत.


CDS Bipin Rawat Demise : CDS Gen. Bipin Rawat यांचे हेलिकॉप्टर अपघातात निधन, अधिकृत घोषणा जारी


https://www.youtube.com/playlist?list=PLh0Ol8Y0tIRRErHuDAISFVMvKukAXJYUi



संबंधित बातम्या :