Jaguar Land Rover : जग प्रसिद्ध कार उत्पादक कंपनी जग्वार लँड रोव्हरने त्यांच्या कारमध्ये आता Amazon Alexa कनेक्टिव्हिटी पर्याय समाविष्ट केला आहे. अ‍ॅलेक्सा हे फिचर सर्व प्रथम जग्वारच्या I‑PACE या कारमध्ये दिले जाणार आहे. जग्वारने आपल्या नव्या गाड्यांमध्ये 'पिवी प्रो इंफोटेनमेंट' सिस्टीम अद्यावत केली आहे. जग्वार आई-पेस इलेक्ट्रिक एसयूवी सुविधा देणारे कंपनीचे पहिलेच मॉडेल आहे.

  
 
जग्वार लँड रोव्हरच्या इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक इंजीनियरिंगचे संचालक अ‍ॅलेक्सा हिस्लोप यांनी सांगितले की, पिवी प्रो इंफोटेनमेंट प्रणालीसह  Amazon Alexa कनेक्टिव्हिटीचा ग्राहकांना सोप्या पद्धतीने वापर करता यावा यासाठी आवाजाने नियंत्रण करण्याचा पर्याय देण्यात आला आहे. त्यामुळे गाडी चालवण्याचा अनुभव पहिल्यापेक्षा चांगला मिळणार आहे. सध्या कार वापरत असलेल्या ग्राहकांनाही ही सुविधा मिळणार आहे.  


नेव्हिगेशन, फोन कॉल मॅनेजमेंट आणि ऑडीओ प्लेबॅक यांसारख्या  फिचरला अ‍ॅलेक्साच्या माध्यमातून ऑपरेट करता येणार आहेत. अ‍ॅलेक्साच्या व्हॉईस कमांडद्वारे चार्जिंग स्टेटस, रेंज किंवा अनलॉक केलेले दरवाजे यासारखी वाहना संबंधितची माहिती शेअर करता येणार आहे. अ‍ॅलेक्सा सिस्टीममुळे चालकांना हवामान आणि बातम्यांचे अपडेट्स देखील मिळणार आहेत. 


सध्या ज्यांच्याकडे जग्वारची आय-पेस ही कार आहे, त्या ग्राहकांनाही अ‍ॅलेक्सा सुविधा अपडेट करता येणार आहे. आधीच आय-पेस असलेल्या ग्राहकांना त्यांच्या कारच्या स्क्रीनवर एक मेसेज येईल. त्या मेसेजनुसार ही सुविधा अद्यावत करता येणार आहे.   


जग्वार आय-पेसची गती
जग्वार आय-पेस 4.8 सेकंदात शून्य ते 100 kmph चा वेग प्राप्त करू शकते. तर ही कार 470 किलोमीटर पर्यंतची रेंज देऊ शकते.  


महत्वाच्या बातम्या


Jaguar: जाग्वार 2025 पासून पूर्णपणे इलेक्ट्रीक कार निर्मिती करणार


लोकसभा अध्यक्षांच्या दिमतीला भारदस्त जग्वार, किंमत....


स्पेशल रिपोर्ट : नाशिक : जॅग्वारसाठी कोट्यवधी दिले, पण सगळे खड्ड्यात गेले!


Tesla Car : थांबायला सांगितलं तरी न ऐकणाऱ्या ड्रायव्हरलेस टेस्ला कार परत बोलावणार


Car loan Information:

Calculate Car Loan EMI