Hyundais Creta : तुम्ही नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ती तुमच्यासाठी किती सुरक्षित आहे? याची माहिती घ्या. बाजारात अशा अनेक सुरक्षित कार उपलब्ध आहेत. क्रॅश चाचणीनुसार मिळालेल्या सुरक्षा रेटिंगवर कोणती कार खरेदी करायची हे तुम्हाला ठरवता येणार आहे. आंतरराष्ट्रीय एजन्सी ग्लोबल NCAP ने हे सुरक्षा रेटिंग जारी केले गेले आहे. या चाचणीत ह्युंदाईची क्रेटा i20 ला तीन स्टार रेटिंग मिळाले आहेत.
सेफर कार्स फॉर इंडिया कॅम्पेनमध्ये क्रेटासह टोयोटाच्या अर्बन क्रूझरचीही चाचणी करण्यात आली. ग्लोबल NCAP च्या क्रॅश चाचणीत ह्युंदाईच्या क्रेटा i20 ला तीन स्टार रेटिंग मिळाले आहे. ग्लोबल एनसीएपीने सांगितले की, या चाचणीत ह्युंदाईच्या क्रेटा मॉडेलची दुहेरी फ्रंट एअरबॅगसह चाचणी घेण्यात आली. ही क्रेटा 2022 मध्ये बनवण्यात आली आहे.
प्रौढ रहिवासी संरक्षण श्रेणीमध्ये ह्युंदाई क्रेटाला 17 पैकी 8 गुण मिळाले आहेत. तर लहान मुलांच्या श्रेणीत 49 पैकी 28.29 गुण मिळाले आहेत. क्रॅश चाचणी दरम्यान SUV मध्ये फ्रंट सीटबेल्ट प्री-टेन्शनर्स, SBR आणि चार-चॅनेल ABS सारख्या सुरक्षा वैशिष्ट्यांसह क्रेटा सहभागी झाली होती. या चाचणीत टोयोटाच्या अर्बन क्रूझरचीही चाचणी करण्यात आली. यामध्ये टोयोटाच्या अर्बन क्रूझरला चार स्टार रेटिंग मिळाले आहे.
या चाचणीनंतर ग्लोबल NCAP सरचिटणीस अलेजांद्रो फ्युरेस म्हणाले, ह्युंदाई आणि टोयोटासारख्या उत्पादकांमध्ये इलेक्ट्रॉनिक स्थिरता नियंत्रणासारख्या सुरक्षा यंत्रणा आणि साइड बॉडी व हेड प्रोटेक्शन एअरबॅगच्या वापराबाबत जागरूकता नाही. त्यामुळे साइड बॉडी संरक्षण वाढवण्याच्या भारत सरकारच्या पुढाकाराचे ग्लोबल NCAP स्वागत करत आहे"
टूवर्ड्स झिरो फाऊंडेशनचे कार्यकारी अध्यक्ष डेव्हिड वार्ड म्हणाले, “आम्ही गेल्या सहा वर्षांत भारतात चाचणी केलेल्या मॉडेल्सच्या सुरक्षा रेटिंगमध्ये प्रगती पाहिली आहे. भारतातील देशांतर्गत असलेले वाहन निर्माते ग्लोबल NCAP च्या सुरक्षा आव्हानाला सामोरे गेले आहेत, ही बाब स्वागतार्ह आहे. त्यामुळे टोयोटा आणि ह्युंदाई सारख्या जागतिक कंपन्यांनी त्यांचे अनुसरण केले पाहिजे."
महत्वाच्या बातम्या
- Car Review : Maruti Baleno की Hyundai i20 कोणती कार सर्वात भारी? वाचा संपूर्ण माहिती
- नव्या फिचरसह ह्युंदाईची स्वस्तातील क्रेटा कार लॉन्च, जाणून घ्या किंमत
- ही आहे जगातील पहिली 'सोलर इलेक्ट्रिक कार', एका चार्जमध्ये गाठते 805 किमी
Car loan Information:
Calculate Car Loan EMI