Hyundai venue facelift Pre Booking : Hyundai ने भारतात आपली Hyundai Venue फेसलिफ्ट लॉन्च केली आहे. कंपनीने नुकत्याच लाँच केलेल्या या कारसाठी 15,000 प्री-बुकिंग झाली आहे. Hyundai Venue फेसलिफ्ट सहा प्रकारांमध्ये लॉन्च करण्यात आली आहे - E, S, S+, S(O), SX आणि SX(O). कंपनीने भारतात Hyundai Venue Facelift 2022 याची किंमत 7.53 लाख रुपये (एक्स-शोरूम) ठेवली आहे. तर याच्या डिझेल व्हेरियंटच्या किमती 9.99 लाखांपासून होते ती 12.32 लाखांपर्यंत जाते.


Hyundai Venue Facelift ची वैशिष्ट्ये


Hyundai Venue Facelift 2022 च्या डिझाइनच्या दृष्टीने ग्राहकांना 'पॅरामेट्रिक ज्वेल ग्रिल' ऑफर करण्यात आली आहे. ज्यामध्ये ग्राहकांना उत्तम क्रोमचा वापरही पाहायला मिळतो. SUV वरील काही अपडेट्सबद्दल बोलायचे झाले तर, मुख्य हेडलॅम्प नवीन बंपरच्या खाली ठेवण्यात आले आहेत. तर मागील बाजूस सेगमेंटेड लाइटिंग एलिमेंट्स आणि पूर्ण-लांबीच्या लाइटबारसह अधिक कोनीय दिवे देखील देण्यात आले आहेत. या सर्वांसोबतच यात अपडेटेड अलॉय व्हील देखील पाहायला मिळतात. इंटीरियर लूकच्या बाबतीत, ही SUV 10.25-इंच टचस्क्रीन इंफोटेनमेंट Boese साउंड सिस्टमने सुसज्ज आहे. मोठ्या नवीन अपडेट्सच्या बाबतीत, यात स्टीयरिंग व्हील आणि सुधारित सेंट्रल कन्सोलमध्ये बदल देखील पाहायला मिळतील.


अलेक्सा आणि व्हॉइस असिस्टंट फीचर्स 


Hyundai Venue मध्ये ग्राहकांना Alexa आणि Assistant चे फीचर मिळतात. होम टू कारसह अलेक्सा आणि व्हॉईस असिस्टंटच्या मदतीने ग्राहक एकाधिक फंक्शन्स आणि कारची स्थिती देखील तपासू शकतात. हे फीचर्स हिंदी आणि इंग्रजी दोन्ही भाषेत तुमच्या सोयीनुसार बदलता येईल. होम टू कार फीचरसह, ग्राहक 7 इतर फीचर्स देखील नियंत्रित करू शकतात. यामध्ये रिमोट क्लायमेट कंट्रोल, रिमोट डोअर लॉक/अनलॉक, रिमोट व्हेइकल स्टेटस चेक, सर्च माय कार, टायर प्रेशर माहिती, इंधन पातळी माहिती आणि स्पीड अलर्ट यांचा समावेश आहे.


इतर महत्वाच्या बातम्या: 



 


Car loan Information:

Calculate Car Loan EMI