2023 Honda CB350 Launched: दिग्गच दुचाकी उत्पदक कंपनी होंडा मोटरसायकल आणि स्कूटर इंडियाने आपली ऑन-बोर्ड डायग्नोस्टिक म्हणजेच OBD2B कंप्लायंट 2023 H'ness CB350 आणि CB350RS बाईक्स देशात लॉन्च केली आहेत. कंपनीच्या BigWing डीलरशिपद्वारे ग्राहकांना या बाईकची डिलिव्हरी या महिन्याच्या अखेरीस सुरू होईल. कंपनीने नवीन 2023 Honda CB350 ची एक्स-शोरूम किंमत 2,09,857 रुपये आणि 2023 Honda CB350RS ची एक्स-शोरूम किंमत 2,14,856 रुपये ठेवली आहे.


2023 Honda CB350 Launched: 'माय सीबी, माय वे' कस्टमायझेशन सेक्शन 


या बाईक्सच्या लॉन्चसोबतच कंपनीने CB350 ग्राहकांसाठी एक नवीन कस्टमायझेशन सेक्शन- 'माय सीबी, माय वे' देखील सादर केला आहे. कंपनीचे हे अस्सल अॅक्सेसरीज कस्टम किट या महिन्याच्या अखेरीस BigWing डीलरशिपवर उपलब्ध होईल. यात 350cc एअर-कूल्ड 4 स्ट्रोक OHC सिंगल-सिलेंडर OBD2B कॉम्प्लायंट इंजिन आहे, जी PGM-FI तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. हे इंजिन 305 Nm टॉर्क जनरेट करते.


2023 Honda CB350 Launched : काय आहे नवीन?


होंडाने या बाईकमधील सिलिंडरवर मेन शाफ्ट कोएक्सियल बॅलेंसर बसवले आहे, ज्यामुळे कंपन जाणवत नाही. बोल्ड लो-पीच आवाजाचा समतोल राखण्यासाठी CB350 च्या एक्झॉस्ट सिस्टमला 45 मिमी टेलपाइप मिळते. नवीन बाईकला होंडा सिलेक्टेबल टॉर्क कंट्रोल (HSTC) देखील मिळतो. 


2023 Honda CB350 Launched: फीचर्स 


नवीन Honda CB350 आणि नवीन CB350RS DLX Pro प्रकार आता Honda च्या स्मार्टफोन व्हॉईस कंट्रोल सिस्टमने (HSVCS) सुसज्ज आहेत. ग्राहक HSVCS अॅप्लिकेशनद्वारे ब्लूटूथद्वारे त्याचा स्मार्टफोन बाईकशी कनेक्ट करू शकतात. यामध्ये यूजर्स फोन कॉल, नेव्हिगेशन, म्युझिक प्लेबॅक आणि मेसेजसह अनेक फीचर्स नियंत्रित करू शकतात.


बाईकला असिस्ट आणि स्लिपर क्लच देखील मिळतो, जे क्लच लीव्हर ऑपरेशन लोड कमी करताना गीअर शिफ्ट हलके करते. यात अॅडव्हन्स डिजिटल-अ‍ॅनालॉग मीटर टॉर्क कंट्रोल, एबीएस, इंजिन इनहिबिटरसह साइड स्टँड इंडिकेटर, गियर पोझिशन इंडिकेटर आणि बॅटरी व्होल्टेज यांसारखे डिटेलिंग मिळतात. याला नवीन इमर्जन्सी स्टॉप सिग्नल (ESS) देखील मिळतो, जो अचानक ब्रेक लागल्यास मागून येणाऱ्या वाहनांना तात्काळ इशारा देतो. बाईकला ड्युअल-चॅनल ABS सह 310mm फ्रंट डिस्क आणि 240mm रियर डिस्क मिळते. 2023 Honda H'ness CB350 ला मानक म्हणून नवीन स्प्लिट सीट देखील मिळते.


Royal Enfield Hunter 350 शी स्पर्धा 


ही बाईक Royal Enfield च्या Hunter 350 शी स्पर्धा करते, ज्यामध्ये 349.33cc BS6 इंजिन उपलब्ध आहे. त्याची प्रारंभिक एक्स-शोरूम किंमत 1.5 लाख रुपये आहे.


Car loan Information:

Calculate Car Loan EMI