Hyundai Mufasa Compact SUV: ह्युंदाईने नवीन कॉन्सेप्टवर आधारित नवीन एसयूव्ही कार Mufasa सादर केली आहे. ऑफ-रोड फीचर्स लक्षात घेऊन कंपनीने ही एसयूव्ही सादर केली आहे. कंपनी पुढील महिन्यात होणाऱ्या शांघाय ऑटो शोमध्ये या कारच्या प्रोडक्शन व्हेरिएंटचे अनावरण करेल आणि जूनमध्ये ही कार लॉन्च केली जाऊ शकते. कंपनी ही कार फक्त चीनमध्येच विकणार आहे.
Hyundai Mufasa Compact SUV: फीचर्स
Hyundai च्या Mufasa Adventure Concept SUV कारला लिफ्ट किटसह 18 इंच अलॉय व्हीलवर मोठे आणि रुंद टायर देण्यात आले आहेत. याचे जबरदस्त ग्राउंड क्लीयरन्स ही कार एक उत्कृष्ट ऑफ-रोड एसयूव्ही बनवते. याशिवाय याच्या बंपरवर अॅल्युमिनिअम अॅक्सेंटचा वापर करण्यात आला आहे. यात स्किड प्लेट्स, वझिबल माउंटिंग पॉइंट्स, साइड सिल्सवरील विशेष पॅटर्न, हुड हँडल, डिफेंडर स्टाइल रीअर विंडो इन्सर्ट आणि इंटिग्रेटेड LEDs सह फ्युचरिस्टिक रूफ रॅक ही देण्यात आला आहे. जागतिक बाजारपेठेत विकल्या जाणार्या टक्सन आणि क्रेटा प्रमाणेच याला ग्लॉसी ब्लॅक पेंट जॉबसह मोठी ग्रिल देखील मिळते. याच्या मागील बाजूस अंडाकृती आकाराचा टेल लाइट देण्यात आला आहे.
या कारच्या आकाराबद्दल बोलायचे झाल्यास, नवीन Mufasa कॉन्सेप्ट SUV ची लांबी 4475mm, रुंदी 1850mm आणि उंची 1685mm आहे. जी याच्या प्रकारानुसार भिन्न असू शकते. याचा व्हीलबेसबद्दल बोलायचे झाले तर, ते 2680mm इतकी आहे. ज्यामुळे कार आणखी छान दिसते. ही 5 सीटर कार आहे. जी कंपनीच्या ix35 ला रिप्लेस करेल.
Hyundai Mufasa Compact SUV: केबिन फीचर्स
Hyundai ने अद्याप आपल्या SUV कारच्या केबिन फीचर्सचा खुलासा केलेला नाही. पण अशी अपेक्षा आहे की कंपनी या कारमध्ये ड्युअल टच स्क्रीन डिस्प्ले इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि इन्फोटेनमेंट सिस्टमसह लॉन्च केली जाऊ शकते. याशिवाय उर्वरित माहिती पुढील महिन्यात उत्पादन आवृत्तीच्या अनावरणाच्या वेळी दिली जाऊ शकते.
Hyundai Mufasa Compact SUV: इंजिन
कंपनी आपली Hyundai Mufasa 2.0L पेट्रोल इंजिनसह सादर करेल, जे 148hp पॉवर निर्माण करण्यास सक्षम असेल. याशिवाय ही कार हायब्रिड आवृत्तीसह सादर केली जाऊ शकते. ज्यामध्ये 48 व्होल्टची इलेक्ट्रिक मोटर दिली जाऊ शकते.
इतर महत्वाची बातमी :
Car loan Information:
Calculate Car Loan EMI