Suzuki Swift Mocca Cafe Edition: मारुती सुझुकीची हॅचबॅक कार स्विफ्ट देशांतर्गत बाजारात खूप पसंत केली जाते. बऱ्याच दिवसांपासून ग्राहक याच्या नवीन आवृत्तीची वाट पाहत होते. अशातच दक्षिण कोरियाची वाहन निर्माता कंपनी सुझुकीने बँकॉक इंटरनॅशनल मोटर शोमध्ये स्विफ्टचा मोक्का कॅफे एडिशन लॉन्च केला आहे. हे स्विफ्टचे लिमिटेड एडिशन मॉडेल आहे, जे कंपनी केवळ थायलंडमध्ये विकणार आहे. या नवीन एडिशनची किंमत 637,000 baht (भारतीय रुपयांनुसार सुमारे 15.36 लाख) आहे, म्हणजे ती नियमित स्विफ्टपेक्षा महाग आहे. याच्या फीचर्सबद्दल सांगायचे तर ते आधीपेक्षा चांगले दिले गेले आहेत. कंपनी 2005 पासून ही कार भारतात विकत आहे. आत्तापर्यंत या कारचे अनेक अपडेट्स बाजारात आले आहेत.
Suzuki Swift Mocca Cafe Edition: स्विफ्ट मोका कॅफे एडिशन डिझाइन
स्विफ्टच्या या नवीन एडिशनच्या डिझाइनबद्दल सांगायचे तर, या कारमध्ये फ्रंट लिप स्पॉयलर, फॉग लाइट्सच्यावर एलईडी डीआरएल आणि अधिक अग्रेसिव्ह आणि स्पोर्टी लुकसह बॉडी क्लॅडिंगचा समावेश करण्यात आला आहे. जे समोरच्या स्पॉयलरपासून व्हील्स आणि मागील बंपरपर्यंत विस्तारले आहे. याशिवाय ट्विन फॉक्स एक्झॉस्ट टिप्स आणि 17-इंच आफ्टर-मार्केट अलॉय व्हील याच्या मागील बाजूस उपलब्ध आहेत.
Suzuki Swift Mocca Cafe Edition: फीचर्स
या कारच्या केबिनमध्ये नवीन ड्युअल टोन कलर कॉम्बिनेशन देण्यात आले आहे. तर कारच्या खालच्या भागाला उबदार पेस्टल तपकिरी रंग आणि त्याच्या छतावर जबरदस्त बेज रंग आणि ORVM देण्यात आला आहे. आतील भाग डॅशबोर्ड आणि डोअरच्या एलिमेंट्सवर पेस्टल ब्राऊन आणि बेज रंग आहे. तसेच कारमध्ये अँड्रॉइड ओएस सपोर्टेड 10 इंच इंफोटेनमेंट सिस्टीम देण्यात आली आहे.
Suzuki Swift Mocca Cafe Edition: पॉवर ट्रेन
थायलंडमध्ये सादर केलेल्या स्विफ्टच्या या मॉडेलमध्ये 1.2L पेट्रोल इंजिन आहे. जे 83 PS पॉवर आणि 108 Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. नवीन कारचे इंजिन E20 इंधनावर चालते, जे आता स्विफ्ट लाइनअपमध्ये अधिक इको-फ्रेंडली पर्याय आहे.
Suzuki Swift Mocca Cafe Edition: या करशी होणार स्पर्धा
मारुती सुझुकीची ही हॅचबॅक कार भारतातील Hyundai Grand i10, Nios, Tata Tiago NRG BS6 आणि Tata Tiago CNG सारख्या कारशी स्पर्धा करते.
इतर महत्वाची बातमी:
Car loan Information:
Calculate Car Loan EMI