Hyundai Electric Cars : कोरियन कार निर्माता कंपनी ह्युंदाई (Hyundai) आपली इलेक्ट्रिक क्रॉसओव्हर कार Ionic 5 (Ioniq 5) यावर्षी लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. कंपनीने अलिकडेच एका इव्हेंटमध्ये कार लॉन्चच्या टाईमलाईनबाबत घोषणा केली आहे. Ioniq 5 N ही Hyundai ची पहिली पूर्णपणे इलेक्ट्रिक कार (EV) असेल. ही कार लॉन्च होण्यापूर्वी कारचा लूक, तिचे फिचर्स, इंटिरीयर संबंधित चर्चा होतेय. याचे काही डिटेल्स समोर आले आहेत. या कारमध्ये नेमकं काय खास असणार आहे या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.
रिपोर्ट्सनुसार, Ioniq 5N इलेक्ट्रिक क्रॉसओव्हरमध्ये स्पोर्टी इंटीरियरसह एक ब्लॅक केबिन असेल. कारच्या फ्रंटला स्पोर्टी बकेट सीट्ससुद्धा देण्यात येणार आहेत. स्टीयरिंग व्हीलच्या मागे असलेले डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि स्पाय शॉट्स स्टीयरिंग व्हीलवर दिसले आहेत.
असे असतील एडव्हान्स फिचर्स :
Ioniq 5 च्या इंटिरिअरमध्ये इंस्ट्रुमेंट कन्सोलसह एक मोठा डिजिटल कन्सोल मिळेल. कारच्या फ्रंटला स्पोर्टी बकेट सीट्ससुद्धा देण्यात येणार आहेत. स्टँडर्ड व्हेरियंटला टू-स्पोक फ्लॅट-बॉटम स्टीयरिंग व्हील मिळते परंतु हेच स्टिअरिंग व्हील परफॉर्मन्स व्हेरियंटमध्ये वापरले जाणार की नाही याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आली नाही.
असा असेल एक्सटर्नल लूक :
Hyundai Ioniq 5 कंपनीच्या इलेक्ट्रिक ग्लोबल मॉड्युलर प्लॅटफॉर्मवर (E-GMP) तयार करण्यात आली आहे. कारचे एक्सट्रनल फिचर्स दमदार आहेत. ज्यामध्ये फ्लश-फिटिंग डोअर हँडल्स, पिक्सेलेटेड एलईडी टेललाइट्सचा एक संच, चौकोनी DRL सह एलईडी हेडलॅम्प, 20-इंच एरोडायनॅमिक्स-डिझाइन केलेले अलॉय व्हील, स्पॉयलर आणि शार्क अँटेना यांसारख्या वैशिष्ट्यांचा समावेश आहे.
Kona नंतर दुसरी इलेक्ट्रिक कार :
Hyundai या वर्षाच्या अखेरीस देशात Ioniq 5 इलेक्ट्रिक क्रॉसओव्हर लॉन्च करू शकते. त्याच्या बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, 58kWh आणि 72.6kWh चे बॅटरी पॅक RWD किंवा AWD दोन्ही कॉन्फिगरेशनसह जागतिक बाजारपेठेत उपलब्ध असलेल्या मॉडेल्समध्ये दिले आहेत. Hyundai Kona EV नंतर Ioniq 5 ही Hyundai ची भारतातील दुसरी इलेक्ट्रिक कार असणार आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Mercedes New Car : 24 ऑगस्टला भारतात येणार Mercedes-AMG EQS 53 4Matic+; जाणून घ्या खास फिचर्स
- Mahindra कडून Scorpio N ऑटोमॅटिक आणि 4WD व्हेरियंटची किंमत जाहीर, जाणून घ्या
- BMW ने लॉन्च केली स्पेशल एडिशन कार, फक्त 10 युनिट्सची करणार विक्री
Car loan Information:
Calculate Car Loan EMI