Mercedes-AMG EQS 53 4Matic+ : पुढील महिन्यात 24 ऑगस्ट रोजी, लग्झरी वाहन निर्माता कंपनी मर्सिडीज-बेंझ आपली नवीन कार AMG EQS 53 4Matic Plus (AMG EQS 53 4Matic+) भारतात लॉन्च करणार आहे. ही उच्च क्षमतेची गाडी CBU रुटमार्फत भारतात आणली जाईल. कंपनीनं गेल्याच वर्षी वेबसाईटवर Mercedes-Benz EQS भारतासाठी लिस्ट केली होती.
AMG EQS 53 4Matic+ चा लूक
EQS 53 4Matic+ चा लूक पाहता, हे पहिले मॉडेल आहे, जे इलेक्ट्रिक व्हेइकल आर्किटेक्चर प्लॅटफॉर्मवर आधारित आहे. याला आकर्षक लूक देण्यासाठी यामध्ये इंटिग्रेटेड LED डीआरएलसोबतच LED हेडलँप, एक LED पट्टी आणि LED टेललाइट्स देण्यात आले आहेत.
AMG EQS 53 4Matic+ ची पॉवरट्रेन
Mercedes-AMG EQS 53 4Matic+ च्या पॉवरट्रेनसाठी 107.8kWh बॅटरी पॅक देण्यात आला आहे. जो 649bhp ची कमाल पॉवर आणि 950Nm चा पीक टॉर्क जनरेट करण्यासाठी सक्षम असेल. Affalterbach द्वारे निर्मित ही अशी पहिलीच EV आहे. मर्सिडीजनं दावा केला आहे की, ही कार एकदा चार्ज केल्यावर 570 किमीपर्यंतची रेंज देऊ शकते आणि केवळ 3.8 सेकंदात ही कार 0 ते 100 किमी प्रतितास वेग घेऊ शकते. रेस स्टार्ट मोडमध्ये डायनॅमिक प्लस पॅकेजसह सुसज्ज असलेल्या या कारचे पॉवर आउटपुट 760 PS आहे.
AMG EQS 53 4Matic+ चे फिचर्स
मर्सिडीजच्या बाकीच्या AMG गाड्यांप्रमाणेच, नव्या EQS 53 4Matic+ मध्ये देखील स्टायलिंग घटक आहेत. यामध्ये सस्पेंशनमध्ये समोर चार-लिंक एक्सल आणि मागील बाजूस मल्टी-लिंक एक्सलशी जोडलेले आहेत. यात अॅडजस्टेबल डॅम्पिंग आणि इलेक्ट्रॉनिकली जोडलेले रियर-एक्सल स्टीयरिंगसह AMG राइड कंट्रोल प्लस सस्पेंशन देखील मिळणार आहे. यात अनेक ड्रायव्हिंग मोड्स ग्राहकांना देण्यात येणार आहेत. जे सस्पेंशन, हँडलिंग, पॉवर आणि बॅटरी मॅनेजमेंट सिस्टम हाताळतात.
AMG EQS 53 4Matic+ ची किंमत
AMG EQS 53 4Matic+ ची भारतातील किंमत अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. परंतु, मीडिया रिपोर्ट्सनुसार, या अद्ययावत फिचर्ससह लॉन्च होणाऱ्या मर्सिडीजची किंमत 2 कोटी रुपये ठेवली जाऊ शकते. लॉन्च झाल्यानंतर ही गाडी Porsche Taycan Turbo S आणि Audi RS e-tron GT se ला टक्कर देईल.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Mahindra कडून Scorpio N ऑटोमॅटिक आणि 4WD व्हेरियंटची किंमत जाहीर, जाणून घ्या
- BMW ने लॉन्च केली स्पेशल एडिशन कार, फक्त 10 युनिट्सची करणार विक्री
Car loan Information:
Calculate Car Loan EMI