Upcoming Cars in November 2022: नोव्हेंबरमध्ये भारतीय बाजारपेठेत दोन जबरदस्त एसयूव्ही लॉन्च होणार आहे. यात प्रसिद्ध कार उत्पादक कंपनी Honda Motors आपली नवीन WR-V सबकॉम्पॅक्ट SUV (2023 Honda WR-V) कार सादर करणार आहे. तर टोयोटा (Toyota) आपली नवीन MPV थ्री-रो इनोव्हा हाय क्रॉस (Toyota Innova HyCross) नोव्हेंबरमध्ये सादर करेल. या दोन्ही कार अत्याधुनिक फीचर्ससह भारतात लॉन्च होणार आहेत. यात ग्राहकांना दमदार इंजिन पाहायला मिळणार. तसेच या कार पेट्रोल-डिझेल आणि हायब्रीट प्रकारात लॉन्च केली जाऊ शकते. याच दोन्ही कारबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ. 


2023 Honda WR-V 


2023 Honda WR-V व्हर्जन GIIAS मध्ये पहिल्यांदा प्रदर्शित करण्यात आली होती. होंडा जागतिक बाजारपेठेत या नवीन SUV कारमध्ये पेट्रोल, पेट्रोल-हायब्रिड (Petrol-hybrid) आणि डिझेल इंजिन पर्याय देऊ शकते. भारतासाठी या कारमध्ये 1.5L i-VTEC पेट्रोल इंजिन दिले जाऊ शकते, हे इंजिन 121 PS पॉवर आणि 145 Nm टॉर्क जनरेट करते. या कारमध्ये मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक (CVT) ट्रान्समिशन पर्याय दिसू शकतात.


फीचर्स 


फिचर्सबद्दल बोलायचे झाले तर कनेक्टेड कार फीचर्स, लेदर अपहोल्स्ट्री, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, अॅम्बियंट लाइटिंग आणि टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम या कारमध्ये पाहायला मिळू शकते.


Toyota Innova HyCross


टोयोटा (Toyota) आपली नवीन Innova HyCross इंडोनेशियामध्ये लॉन्च करणार आहे. ही कार पुढील वर्षी भारतात लॉन्च होऊ शकते. नवीन इनोव्हा यावेळी नवीन मोनोकोक प्लॅटफॉर्मवर (Monocoque platform) तयार करण्यात आली आहे, तर कंपनी सध्याची इनोव्हा ladder frame चेसिस प्लॅटफॉर्मवर तयार केली आहे. या नव्या कारमध्ये रियर व्हील ड्राइव्हऐवजी फ्रंट व्हील ड्राइव्ह सिस्टिम दिसणार आहे. या कारचा आकार सध्याच्या इनोव्हा क्रिस्टापेक्षा जास्त असेल. एका रिपोर्टनुसार, नवीन इनोव्हा हायक्रॉस स्ट्रॉंग-हायब्रिड (hybrid) तंत्रज्ञानासह 2.0L पेट्रोल इंजिनसह सुसज्ज असू शकते. यामध्ये ई-सीव्हीटी ऑटोमॅटिक गिअरबॉक्स पाहता मिळू शकते. 360-डिग्री कॅमेरा, टोयोटा सेफ्टी सेन्स (टीएसएस), Ventilated seats, वायरलेस फोन चार्जिंगसह इतर अनेक फीचर्स या कारमध्ये दिली जाऊ शकतात.


इतर महत्वाची बातमी: 


Volkswagen Taigun : Volkswagen ची First Anniversary Edition Taigun कार भारतात लॉन्च; पॉवरफुल इंजिनसह मिळतील 'हे' भन्नाट फिचर्स


Car loan Information:

Calculate Car Loan EMI