Cheapest Electric Car In India: देशातील इलेक्ट्रिक कारची बाजारपेठ मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशातच अनेकजण इलेक्ट्रिक कार खरेदी करण्याचा विचार करत आहेत. मात्र पेट्रोल-डिझेल कारच्या तुलनेत इलेक्ट्रिक कारची किंमत अधिक असल्याने अनेकजण ही कार खरेदी करण्याचं टाळत आहे. तुमचंही इलेक्ट्रिक कार खरेदी न करण्याचं हेच कारण असेल, तर आम्ही तुम्हाला देशात उपलब्ध असलेल्या सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार्सबद्दल माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊ देशातल्या सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार्स कोणत्या आहेत आणि याची किंमत किती आहे.
Tata Tiago EV
Tiago EV 19.2kWh आणि 24kWh च्या दोन बॅटरी पॅक पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. या बॅटरी पॅकसह जोडलेली इलेक्ट्रिक मोटर अनुक्रमे 61 PS पॉवर आणि 110 Nm टॉर्क आणि 75 PS पॉवर आणि 114 Nm टॉर्क जनरेट करते. लहान बॅटरी 250 किमीपर्यंतची रेंज देते, तर मोठा बॅटरी पॅक 315 किमीची रेंज देतो. Tiago EV चार चार्जिंग पर्यायांना सपोर्ट करते. ज्यामध्ये 15A सॉकेट चार्जर, 3.3kW AC चार्जर, 7.2kW AC चार्जर आणि DC फास्ट चार्जर यांचा समावेश आहे. या कारची एक्स-शोरूम किंमत 8.49 लाख रुपये आहे.
Tata Tigor EV
या इलेक्ट्रिक सेडानमध्ये Nexon EV प्रमाणेच Ziptron EV तंत्रज्ञान मिळते. Tigor EV मध्ये 26 kWh बॅटरी पॅक आणि 75 PS आणि 170 Nm आउटपुट जनरेट करणारी इलेक्ट्रिक मोटर आहे. स्टँडर्ड वॉल चार्जर वापरून ही कार 8.5 तासांत 0-80 टक्के चार्ज केली जाऊ शकते आणि 25kW DC फास्ट चार्जर वापरून फक्त 60 मिनिटांत. Tigor EV 306 किमी पर्यंतची रेंज देण्यास सक्षम आहे. या कारची एक्स-शोरूम किंमत 12.49 लाख रुपये आहे.
Tata Nexon EV Prime
Nexon EV प्राइम 30.2kWh लिथियम-आयन बॅटरीद्वारे समर्थित आहे, ज्याला जोडलेली इलेक्ट्रिक मोटर 129 PS पॉवर आणि 245 Nm टॉर्क जनरेट करते. या कारची ARAI रेंज 312 किमी असल्याचा दावा केला जात आहे. 3.3kW AC चार्जर वापरून बॅटरी पूर्णपणे चार्ज होण्यासाठी 8.5 तास लागतात. तर 50kW DC फास्ट चार्जरसह ही कार फक्त 60 मिनिटांत 0 ते 80% पर्यंत चार्ज केली जाऊ शकते. या कारची एक्स-शोरूम किंमत 14.99 लाख रुपये आहे.
Tata Nexon EV Max
Nexon EV Max मध्ये पॉवरसाठी 40.5kWh बॅटरी पॅक वापरण्यात आला आहे. याची इलेक्ट्रिक मोटर 143 PS पॉवर आणि 250 Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. 437 किमी एआरएआय प्रमाणित रेंजचा दावा आहे. ही इलेक्ट्रिक SUV 3.3kW आणि 7.2kW च्या दोन चार्जिंग पर्यायांसह चार्ज केली जाऊ शकते. ज्यांना अनुक्रमे 15 तास आणि सहा तास लागतात. तसेच 50kW DC फास्ट चार्जर केवळ 56 मिनिटांत त्याची बॅटरी 0 ते 80 टक्के चार्ज करू शकतो. या कारची एक्स-शोरूम किंमत 18.34 ते 20.04 लाख रुपये आहे.
MG ZS EV
ZS EV ही 5 सीटर SUV आहे. जी 50.3 kWh बॅटरी पॅकद्वारे समर्थित आहे. यामध्ये सापडलेली इलेक्ट्रिक मोटर 176 पीएस पॉवर जनरेट करते. ही कार एका चार्जमध्ये 461 किमीची रेंज देण्यास सक्षम आहे. ही कार दोन प्रकारात बाजारात उपलब्ध आहे. या कारची एक्स-शोरूम किंमत 22.58 लाख रुपये आहे.
Car loan Information:
Calculate Car Loan EMI