Honda Shine 125 Sales Report: Honda Motorcycle and Scooter India (HMSI) ने घोषणा केली आहे की, कंपनीची बाईक शाईन 125 cc (Honda Shine 125) ने 20 लाखांहून अधिक युनिट्सची विक्री करून नवीन विक्रम केला आहे. कंपनीने उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या मध्यवर्ती राज्यांमध्ये ही विक्री केली आहे. गेल्या 6 वर्षांत ग्राहकांनी 10 लाखांहून अधिक मोटारसायकल खरेदी केल्याचेही कंपनीने सांगितले आहे. कंपनीनेने सांगितले आहे की, त्यांच्या शाईन कम्युटर बाईक, 125cc च्या सेगमेंटमध्ये 50% पेक्षा जास्त मार्केट शेअर आहे. या बाईकने आधीच भारतात 10 लाख ग्राहकांचा टप्पा गाठला आहे.
कंपनीच्या या यशाबद्दल बोलताना होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक, अध्यक्ष आणि सीईओ अत्सुशी ओगाटा म्हणाले, “आम्ही उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, उत्तराखंड आणि छत्तीसगडमधील आमच्या ग्राहकांचे आभारी आहोत. 125cc मोटारसायकल सेगमेंटमध्ये वाढत्या मागणीसह, Honda Shine ने खरोखरच आपल्या ग्राहकांसाठी एक चांगली ऑफर आणली आहे.” ओगाटा पुढे म्हणाले की, आमच्या ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी कंपनीकडे 1200 पेक्षा जास्त Honda 2 व्हीलर टचपॉईंट असून आम्ही ग्राहकांच्या सेवेसाठी नेहमीच तयार असतो.
होंडा शाइनला याआधी 125cc सेगमेंटमध्ये 29 टक्के वार्षिक वाढीसह सर्वाधिक पसंतीचा पर्याय म्हणून पुरस्कार देण्यात आला होता. मोटरसायकल 125cc इंजिनद्वारे समर्थित आहे. जी 7,500 rpm वर 10.72 Bhp ची कमाल पॉवर आणि 6,000 rpm वर 10.9 Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. याच्या इंजिनला पाच-स्पीड गिअरबॉक्स मिळतो. दरम्यान, कंपनी फ्लेक्स इंधनावर आधारित मॉडेल सादर करण्यावर काम करत असल्याची माहिती आहे. ही बाईक 2023 पर्यंत भारतीय बाजारात दिसू शकते. कॉम्प्युटर बाईकक्सप्रमाणेच काही निवडक मॉडेल्स आंतरराष्ट्रीय बाजारात सादर करण्याची कंपनीची योजना आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Car : Toyota Urban Cruiser Hyryder, Hyundai Creta की Kia Seltos कोणती कार सर्वात भारी? वाचा A to Z माहिती
- सेल्फ चार्जिंगसारख्या जबरदस्त फीचरसह Toyota Hyryder सादर, 'हे' फीचर्स फक्त यातच मिळणार
- Car : टोयोटाच्या नवीन Urban Cruiser Hyryder SUV कारचा वाचा संपूर्ण रिव्ह्यू
Car loan Information:
Calculate Car Loan EMI