डिलिव्हरी आणि कुरिअरसाठी येत आहे खास स्कूटर, एकदा चार्ज केल्यावर मिळेल इतकी रेंज
इलेक्ट्रिक वाहनांचा वाढता बाजार पाहून आघाडीच्या वाहन उत्पादक कंपन्या यात उडी घेत आहेत. यात आता आणखी एक कंपनीचं नाव सामील झालं आहे, ही कंपनी आहे Honda. होंडा लवकरच आपली इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च करणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकंपनीने आपल्या इलेक्ट्रिक स्कूटरची भारतातील रस्त्यांवर चाचणी सुरू केली आहे. अलीकडे Honda ची Benly e (Honda Benly-e) इलेक्ट्रिक स्कूटर कर्नाटकातील बेंगळुरू शहरात चाचणी दरम्यान दिसली आहे.
Honda ची Benly e स्कूटर जपानसह आशियातील अनेक दक्षिण-पूर्व देशांमध्ये आधीच विकली जात आहे. ही एक कार्गो ई-स्कूटर आहे. जी डिलिव्हरी आणि कुरिअरसाठी वापरली जाऊ शकते. समोर आलेल्या फोटोत दिसत असल्या प्रमाणे, ही स्कूटर पांढऱ्या रंगाची असून तिच्या समोर एक मोठा सामानवाहक बसवण्यात आला आहे.
ही सिंगल सीटर ई-स्कूटर आहे आणि याला मागील सीटऐवजी लगेज कॅरिअर देखील मिळतो. एक मोठा सामानाचा डबा किंवा बॅग मागील कॅरियरवर ठेवता येऊ शकतो. ही ई-स्कूटर डिलिव्हरी आणि कुरिअर सेवेसाठी एक व्यावहारिक स्कूटर असल्याचे सिद्ध होऊ शकते.
भारतीय बाजारात कंपनी Honda Cliq ही व्यावसायिक स्कूटर म्हणून विकत आहे. तर Honda Benly e चार मॉडेल्समध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात सादर करण्यात आली आहे. या प्रकारांमध्ये Benly e: I, Benly e: I Pro, Benly e: II आणि Benly e: II Pro चा समावेश आहे.
ही इलेक्ट्रिक स्कूटर आंतरराष्ट्रीय बाजारात विविध बॅटरी पॅक आणि पर्यायांसह उपलब्ध आहे. बेस मॉडेलला 2.8 kW ची इलेक्ट्रिक मोटर मिळते, तर अधिक पॉवरफुल मॉडेलला 4.2 kW ची इलेक्ट्रिक मोटर मिळते. सर्व प्रकारांमध्ये दोन स्वॅप करण्यायोग्य 48V बॅटरी आहेत.