2023 Honda Livo launch : Honda Motorcycle and Scooter India ने भारतात आपली अपडेटेड 2023 Livo बाईक लॉन्च केली आहे. या बाईकची दिल्लीतील एक्स-शोरूम किंमत 78,500 रुपयांपासून सुरू होते. नवीन अपडेटसह, Livo आता OBD2 अनुरूप आहे. ही एंट्री-लेव्हल कम्युटर मोटरसायकल ड्रम आणि डिस्क या दोन व्हेरिएंटमध्ये लॉन्च करण्यात आली आहे. डिस्क व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 82,500 रुपये आहे. कंपनी Honda अपडेट केलेल्या Livo वर 10 वर्षांचे वॉरंटी पॅकेज (3 वर्ष +7 वर्ष ऑप्शनल एक्सटेंडेड वॉरंटी) देत आहे. 


बाईकमध्ये काय अपडेट आहे?


2023 Livo ची संपूर्ण डिझाईन नवीन ग्राफिक्स, अॅडव्हान्स आणि रिडिझाइन्ड केलेले फ्रंट व्हिझर आणि टेललाईट्ससह बदलण्यात आली आहे. हे तीन कलर ऑप्शनमध्ये सादर करण्यात आले आहे. या बाईकमध्ये अॅथलेटिक ब्लू मेटॅलिक, मॅट क्रस्ट मेटॅलिक आणि ब्लॅक यांचा समावेश आहे. लिवोला 'अर्बन स्टाईल' देण्यासाठी होंडाने हे अपडेट दिले आहे. 


बाईकची डिझाईन कशी आहे?


मस्क्यूलर फ्युएल टँक आणि एकूणच स्टाईलमुळे बाईकला स्पोर्टी लूक मिळतो. यात ट्यूबलेस टायर्ससह 18-इंच अलॉय व्हील, एक DC हॅलोजन हेडलॅम्प, 657 मिमी उंच सीट, इंटिग्रेटेड इंजिन स्टार्ट/स्टॉप स्विच, 5-स्टेप प्रीलोड अॅडजस्टेबल रीअर शॉक ऍब्जॉर्बर्स, RSU टेलिस्कोपिक फ्रंट फोर्क्स आणि कॉम्बी ब्रेक सिस्टम मिळते.


2023 होंडा लिव्हो इंजिन कसे आहे?


पॉवरसाठी, Livo मध्ये 109.51cc सिंगल-सिलेंडर, एअर-कूल्ड इंजिन देण्यात आले आहे, जे 8.67 bhp पॉवर आणि 9.30 Nm पीक टॉर्क जनरेट करते. हे 4-स्पीड गिअरबॉक्ससह जोडलेले आहे. OBD2 सह, या इंजिनला आता सायलेंट इंजिन सुरू करण्यासाठी ACG स्टार्टर मिळेल. ब्रशलेस मोटर जनरेटर म्हणूनही काम करते जी वीज निर्माण करण्यासाठी आणि बॅटरी चार्ज करण्यासाठी वापरली जाते.


कंपनीने काय सांगितले?


बाईकच्या लॉंचिंग प्रसंगी बोलताना, डायरेक्टर, सेल्स आणि मार्केटिंग, HMSI चे योगेश माथूर म्हणाले, “2015 मध्ये लॉन्च झाल्यापासून, LIVO त्याच्या सेगमेंटमधील खरेदीदारांच्या पसंतीस उतरले आहे आणि OBD2 नॉर्म्समध्ये संक्रमण झाल्यामुळे, आम्ही त्याचे आकर्षण वाढवत आहोत. 


2023 होंडा कोणाशी स्पर्धा करणार?


ही बाईक TVS Radeon आणि Hero Passion Pro सारख्या बाईकशी स्पर्धा करते. यामध्ये 109cc सिंगल सिलेंडर BS6 पेट्रोल इंजिन उपलब्ध आहे. त्याची एक्स-शोरूम किंमत 73 हजार रुपयांपासून सुरू होते.


महत्त्वाच्या बातम्या : 


Tata Nexon Facelift 2023 : Tata Nexon फेसलिफ्ट या वर्षी सप्टेंबरमध्ये होणार लॉन्च; 'हे' असतील कारचे बेस्ट फीचर्स


Car loan Information:

Calculate Car Loan EMI