Honda CB300F vs Honda CB300R : Honda ने नुकतीच CB300F स्ट्रीट-फायटर बाईक लॉन्च केली आहे. दिल्लीच्या एक्स-शोरूममध्ये या बाईकची किंमत 2.26 लाख रुपये आहे. येथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की CB300R ही 300cc सेगमेंटमधील होंडाच्या लाईन-अपमधील दुसरी निओ-रेट्रो बाईक आहे. या दोन बाईकबद्दल लोकांमध्ये अनेकदा गोंधळ झाल्याचे दिसून येते. या दोन बाईकची किंमत, फिचर्स काय आहे. या संदर्भात अधिक माहिती जाणून घ्या. 


डिझाईन आणि रंग :


Honda ची CB300F ही एक स्ट्रीट फायटर बाईक आहे आणि ती स्पोर्टी लूकसह येते. तर, CB300R ही निओ-रेट्रो बाईक आहे. ज्याचा लूक अतिशय उत्तम आहे. या दोन्ही बाईकमध्ये V आकाराचे अलॉय व्हील्स, फुल एलईडी लाइटिंग सिस्टीम, स्टबी एक्झॉस्ट आणि स्प्लिट सीट सेट-अप आहेत. Honda CB300F मॅट अॅक्सिस ग्रे मेटॅलिक, स्पोर्ट्स रेड आणि मॅट मार्वल ब्लू मेटॅलिक अशा तीन कलरच्या ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे. तर, CB300R मॅट स्टील ब्लॅक आणि पर्ल स्पार्टन रेड कलरमध्ये येतो. 


इंजिन आणि गिअरबॉक्स :


Honda CB300F 293.52cc सिंगल-सिलेंडर, ऑइल-कूल्ड, FI इंजिनद्वारे समर्थित आहे. हे इंजिन 24.1 bhp पॉवर आणि 25.6 Nm पीक टॉर्क जनरेट करते. तर, Honda CB300R 286.01cc सिंगल-सिलेंडर, लिक्विड-कूल्ड, FI इंजिनसह येते जे 27.5 Nm पीक टॉर्कसह 30 bhp पॉवर जनरेट करू शकते. होंडा या दोन्ही बाइक्सवर असिस्ट आणि स्लिपर क्लचसह 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स ऑफर करते.


हार्डवेअर आणि फिचर्स : 


दोन्ही होंडा बाइक्समध्ये गोल्डन USD फ्रंट फोर्क्स आहेत. यामध्ये स्टँडर्ड ड्युअल चॅनल अँटीलॉक ब्रेकिंग सिस्टम उपलब्ध आहे. दोन्ही मोटारसायकलींना 17-इंच ट्यूबलेस टायरसह ऑल-डिजिटल इन्स्ट्रूमेंट क्लस्टर मिळतो. तर, CB300F ला ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आणि व्हॉईस कंट्रोल सिस्टम सारखी अतिरिक्त फिचर्स आढळतात. 


किंमत किती? 


अलीकडेच लाँच झालेली Honda CB300F डिलक्स आणि डिलक्स प्रो या दोन व्हेरियंटमध्ये ऑफर केली आहे. कंपनीने आपले बुकिंग देखील सुरू केले आहे, ज्याची डिलिव्हरी कंपनी लवकरच सुरू होणार आहे. या बाईकच्या डिलक्स व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 2.26 लाख आहे. तर, Deluxe Pro ची किंमत 2.29 लाख आहे. त्याच व्हेरियंटमध्ये येणाऱ्या Honda CB300R ची दिल्लीत एक्स-शोरूम किंमत 2.77 लाख रुपये आहे.


महत्वाच्या बातम्या : 



Car loan Information:

Calculate Car Loan EMI