Honda Activa 7g Release Date: भारतीय बाजारपेठेत Honda Activa ही सर्वाधिक विक्री होणाऱ्या स्कूटरपैकी एक आहे. भारत ही स्कूटर खूप पसंत केली जाते. गेल्या महिन्यात कंपनीने याच्या 2,10,623 युनिट्सची विक्री केली होती. यावरूनच याच्या लोकप्रियतेचा अंदाज लावला जाऊ शकतो. या स्कूटरची विश्वासार्हता, मायलेज आणि कमी मेन्टेनन्स खर्च यासाठी ग्राहकांकडून यांची नेहमीच प्रशंसा केली जाते. कंपनी आपल्या या स्कूटरमध्ये सतत बदल करून ही अपडेट करत असते, यामुळेही देशात या स्कूटरची लोकप्रियता ही कायम आहे. होंडा दर दोन वर्षांनी नवीन जनरेशन अॅक्टिव्हा लॉन्च करते. सध्या Activa 6G ची विक्री सुरु आहे. कंपनी आता लवकरच आपली सेव्हेन जनरेशन Activa 7G लॉन्च करू शकते.
Activa 7G मध्ये काय असेल नवीन?
सध्या Activa 7G बद्दल अधिकृत माहिती समोर आलेली नाही. परंतु तज्ञांचे मत आहे की, याच्या डिझाइनमध्ये फारसा बदल होणार नाही. साधारणपणे आत्तापर्यंतच्या प्रत्येक अॅक्टिव्हा स्कूटरची डिझाइन जुन्या मॉडेलसारखीच होती. यातच नवीन अॅक्टिव्हा स्कूटरमध्ये सध्याच्या मॉडेलपेक्षा बरेच अपडेट फीचर्स दिले जातील. Honda 7 जनरेशनच्या Activa स्कूटरच्या इंजिनमध्ये मोठे बदल करू शकते. काही रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की, Activa 7G नवीन हायब्रिड इंजिनसह येईल. हे 109 सीसीचे हायब्रिड इंजिन असेल जे बॅटरीमधून पॉवर मिळवेल. यामाहा सध्या आपल्या Fascino आणि Ray ZR स्कूटरमध्ये हायब्रिड इंजिन वापरत आहे.
कंपनी नवीन जनरेशन अॅक्टिव्हा स्कूटरमध्ये स्टार्ट-स्टॉप तंत्रज्ञान आणि स्मार्ट पॉवर जनरेटर देखील देऊ शकते. जे स्कूटरची कार्यक्षमता सुधारेल आणि मायलेज देखील वाढवेल. याशिवाय स्कूटरमध्ये मोठे व्हील्स दिले जाऊ शकतात. ज्यामुळे ही स्कूटर हाताळणी अधिक चांगले होईल. सध्या Activa 6G मध्ये अॅनालॉग इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे. जे त्याच्या काही प्रतिस्पर्ध्यांच्या तुलनेत थोडे जुने दिसते. Activa 7G मध्ये कंपनी डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टरसह ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, हायब्रिड स्विच इत्यादी फीचर्स देऊ शकते, अशी अपेक्षा केली जात आहे. दरम्यान, भारतात Activa 7G कधी लॉन्च होणार? तसेच यामध्ये कोणते नवीन फीचर्स दिले जाऊ शकतात? आणि याची किंमत किती असेल, याबद्दल कंपनीने अद्याप कोणतीही माहिती जाहीर केलेली नाही.
इतर महत्वाच्या बातम्या:
Car loan Information:
Calculate Car Loan EMI