Hero-Harley Bike: प्रसिद्ध दुचाकी उत्पादक कंपनी रॉयल एनफिल्डच्या बाईक भारतात खूप पसंत केल्या जातात. कंपनीच्या बाईकला भारत मोठी मागणी असून याची विक्री देखील देशात चांगली होत आहे. यातच आता रॉयल एनफिल्डला टक्कर देण्यासाठी Hero MotoCorp आणि Harley Davidson भागीदारीत नवीन बाईक आणण्याची तयारी करत आहे. याच बाईकबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ.  


एका रिपोर्ट्सनुसार, हीरो-हार्ले बाईकवर सध्या काम सुरू आहे. ही बाईक खूप हलकी किंवा खूप जडही नसणार. या बाईकमध्ये कंपनी कोणेते फीचर्स देण्यात याबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. तसेच दोन्ही कंपनी मिळून या बाईकला काय नाव देतील, हे देखील अद्याप कळू शकलेलं नाही आहे. Hero MotoCorp सध्या देशात Harley-Davidson ची विक्री आणि सर्व्हिस हाताळते. ही नवीन बाईक आधीपासून कार्यरत असलेल्या चॅनेलद्वारेच विकली जाईल. Hero MotoCorp चे सीएफओ निरंजन गुप्ता यांच्या म्हणण्यानुसार, Hero लवकरच एक प्रीमियम बाईक लॉन्च करेल. सोबतच येत्या 2 वर्षात Harley-Davidson सोबत संयुक्तपणे नवीन प्लॅटफॉर्म विकसित करणार आहे.


Hero MotoCorp ने अलीकडेच आपल्या नवीन बाईक Xpulse 200T चा टीझर रिलीज केला आहे. ज्यामध्ये या बाईकशी संबंधित बरीच माहिती समोर आली आहे. ही बाईक लवकरच देशात लॉन्च केली जाऊ शकते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही बाईक मॅट शील्ड गोल्ड, स्पोर्ट्स रेड आणि ग्रे आणि निऑन अशा तीन रंगांमध्ये येईल. हे सर्व ड्युअल टोन रंग आहेत.


Royal Enfield Super Meteor 650 


नवीन Royal Enfield Super Meteor 650 भारत जानेवारी 2023 मध्ये लॉन्च होऊ शकते. याची अंदाजित किंमत 3.5 लाख रुपये असू शकते. कंपनीने Super Meteor 650 ची बुकिंग सुरू केली आहे. कंपनीने सध्या ही बुकिंग फक्त Rider Mania मध्ये सहभागी होणाऱ्या लोकांसाठी सुरू केली आहे.  Super Meteor 650 मध्ये जुन्या मॉडेलमध्ये असलेलेच इंजिन देऊ शकते. Royal Enfield Meteor 650 च्या पुढील आणि मागील चाकांमध्ये अनुक्रमे 320 mm आणि 300 mm चे डिस्क ब्रेक देऊ शकते. तसेच कंपनी यात ड्युअल चॅनल ABS देऊ शकते. Royal Enfield चे अनेक चाहते या बाईकच्या प्रतीक्षेत आहेत. भारतात ही बाईक लॉन्च झाल्यावर याला चांगला प्रतिसाद मिळू शकतो.  


Car loan Information:

Calculate Car Loan EMI