EV Charging Stations India: गुगल मॅप हे एक असे अॅप आहे जे प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये असतेच. गूगल मॅपमुळे कुठेही जाताना मार्ग शोधणे खूपच सोप्पे झाले आहे. गुगल आपल्या सेवा अधिक सोयीस्कर बनवण्यासाठी वेळोवेळी नवनवीन फीचर्स जोडत राहते. यातच आता गुगलने इलेक्ट्रिक कारच्या चार्जिंग स्टेशन शोधण्यासाठी Google Map मध्ये एक नवीन फीचर जोडले आहे. हे नवीन फीचर नेमके काय आहे आणि हे कसे काम करते, याबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.  


गुगल मॅप फास्ट चार्ज


येणाऱ्या काळात इलेक्ट्रिक कारच्या वापरात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. जगभरासह भारतातही इलेक्ट्रिक कारच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. मात्र असं असलं तरी भारतात अनेक ठिकाणी अजूनही चार्जिंग स्टेशनला पायाभूत सुविधा तयार झालेली नाही आहे. यातच जिथे चार्जिंग स्टेशन उभारण्यात आले आहे. याचे प्रमाण देखील खूप कमी आहे. त्यामुळे लोकांना याचा शोध घेणे कठीण होते. यावरच आता गुगलने तोडगा काढला आहे. गुगलने आपल्या गुगल मॅप अॅपवर 'फास्ट चार्ज' हे नवीन फीचर जोडले आहे. या फीचरच्या मदतीने युजर्स त्यांच्या जवळच्या 50kw किंवा अधिक क्षमतेच्या चार्जिंग स्टेशनबद्दल सहज माहिती मिळू शकतात. या चार्जिंग स्टेशनमध्ये चार्जिंग पोर्ट्स देखील उपलब्ध आहेत.  हे फीचर अँड्रॉइड आणि आयओएस दोन्ही युजर्सच्या मोबाईलमध्ये उपलब्ध आहे. यासाठी तुमच्या मोबाईलमध्ये असलेले गुगल मॅप अॅप अपडेट करणे आवश्यक आहे.


मोबाइल अपडेटनंतर तुम्हाला आणखी एक उत्कृष्ट फीचर लाइव्ह व्ह्यू देखील मिळणार आहे. यामुळे तुम्ही तुमचा मोबाईल वेगवेगळ्या दिशेने हलवल्यास तुम्हाला गुगल मॅपवर ( Google Map ) कॉफी शॉप आणि ATM कुठे आहे, हे देखील समजणार आहे. तसेच कॅमेरा उघडून आपण कोणतेही स्थान शोधू शकता. हे फीचर ऑगमेंटेड रिअॅलिटी (एआर) तंत्रज्ञानावर काम करते. दरम्यान, गुगलचे हे नवीन फीचर नुकतेच लंडन, लॉस एंजेलिस, न्यूयॉर्क, सॅन फ्रान्सिस्को, टोकियो आणि पॅरिस सारख्या शहरांमध्ये सुरू झाले आहे. हे नवीन फीचर भारतात या वर्षाच्या अखेरीस किंवा नवीन वर्षाच्या सुरुवातीला लॉन्च केले जाऊ शकते.


इतर महत्वाची बातमी: 


Mumbai To Amravati: एकदा टाकी फुल केल्यावर मुंबई ते अमरावतीपर्यंत धावेल 'ही' बाईक, जाणून घ्या किती आहे मायलेज


 


  


Car loan Information:

Calculate Car Loan EMI