एक्स्प्लोर

ऑगस्टमध्ये वाहन विक्रीमध्ये आठ टक्क्यांची वाढ, तरीही कोरोनापूर्व काळापेक्षा प्रमाण कमीच

Auto Sales : या ऑगस्टमध्ये वाहनांच्या विक्रीमध्ये जरी आठ टक्क्यांची वाढ झाली असली तरी ती कोरोनापूर्व काळापेक्षा सात टक्क्यांनी कमी आहे. 

नवी दिल्ली : गेल्या महिन्यात म्हणजेच ऑगस्टमध्ये देशातील वाहनांची एकूण विक्री आठ टक्क्यांहून अधिक वाढली आहे. परंतु कोविडच्या आधीच्या पातळीपेक्षा अजूनही सात टक्के कमी आहे. वाहन विक्रेत्यांची संघटना असलेल्या फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशनने अर्थात (FADA) जारी केलेल्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे. 

फाडाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार ऑगस्ट 2022 मध्ये देशभरात एकूण 15,21,490 वाहनांची विक्री झाली होती, जी मागील वर्षी म्हणजे ऑगस्ट 2021 मध्ये 14,04,704 होती. त्यानुसार ऑगस्टमध्ये वाहनांच्या एकूण विक्रीत 8.31 टक्क्यांनी वाढ झाली आहे. परंतु कोविड-19 महामारीपूर्वी म्हणजेच ऑगस्ट 2019 च्या तुलनेत ती अजूनही सुमारे 7 टक्के कमी आहे.

प्रवासी वाहन विक्रीत वाढ

फाडाच्या आकडेवारीनुसार या वर्षी ऑगस्टमध्ये पॅसेंजर व्हेइकल्स (PV) ची किरकोळ विक्री 2,74,448 होती, जी ऑगस्ट 2021 मध्ये 2,57,672 होती. त्यानुसार, गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी याच कालावधीत पीव्हीच्या विक्रीत 6.51 टक्के वाढ झाली आहे. 

पण एक मनोरंजक आकडेवारी अशी आहे की ऑगस्ट 2022 मध्ये पीव्हीच्या विक्रीत कोविडच्या आधीच्या वर्षाच्या त्याच कालावधीच्या तुलनेत म्हणजेच ऑगस्ट 2019 नंतर 40 टक्क्यांहून अधिक वाढ नोंदवली गेली आहे यंदा सणासुदीच्या काळात वाहनांची मागणी झपाट्याने वाढणार असल्याचे या तेजीवरून दिसून येते. 

ऑगस्ट 2022 मध्ये दुचाकींची किरकोळ विक्री 10,74,266 होती. तर गेल्या वर्षी ऑगस्ट 2021 मध्ये हा आकडा 9,89,969 होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी याच कालावधीत दुचाकी वाहनांच्या किरकोळ विक्रीत 8.52 टक्के वाढ झाली आहे.

यावर्षी ऑगस्ट महिन्यात तीनचाकी वाहनांच्या किरकोळ विक्रीत सर्वाधिक 83.14 टक्के वाढ झाली असल्याचं फाडाने सांगितले. तीनचाकी वाहनांची किरकोळ विक्री ऑगस्ट 2021 मध्ये 30,748 युनिट्सच्या तुलनेत ऑगस्ट 2022 मध्ये 56,313 युनिट होती. गेल्या महिन्यात म्हणजेच ऑगस्ट 2022 मध्ये 24.12 टक्क्यांच्या वाढीसह व्यावसायिक वाहन (CV) विक्री 67,158 युनिट्सवर पोहोचली. तर ऑगस्ट 2021 मध्ये हा आकडा 54,107 युनिट होता. 

ऑगस्टमधील किरकोळ विक्री उत्साहवर्धक नव्हती आणि डीलर्स अधिक अपेक्षा करत होते. गणेश चतुर्थीपासून सणासुदीची सुरुवात चांगली होईल, अशी अपेक्षा एफएडीएचे अध्यक्ष मनीष राज सिंघानिया यांनी व्यक्त केली.



दीपक पळसुले हे मागील 12 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत आहेत. वृत्तनिवेदक म्हणून दशकभरापासून एबीपी माझामध्ये सक्रीय आहेत.  अर्थ, राजकारण, समाजकारण, शेती,सांस्कृतिक, टेक-ऑटो  अशा विविध विषयांमध्ये त्यांचा व्यासंग आहे.   
Read More

महत्त्वाच्या बातम्या

लवकरच 100 टक्के इथेनॉलवर चालणारी कार येणार, फक्त 25 रुपये लीटरमध्ये प्रवास होणार
लवकरच 100 टक्के इथेनॉलवर चालणारी कार येणार, फक्त 25 रुपये लीटरमध्ये प्रवास होणार
सर्वसामान्य लोकांचं कार घेण्याचं स्वप्न पूर्ण होणार! टाटा मोटर्सकडून नवीन टाटा एरिस लॉंच, जबरदस्त लूक आणि फिचर
सर्वसामान्य लोकांचं कार घेण्याचं स्वप्न पूर्ण होणार! टाटा मोटर्सकडून नवीन टाटा एरिस लॉंच, जबरदस्त लूक आणि फिचर
Maruti Suzuki Baleno Facelift: मारुतीची नवी 'Baleno' लाँच! Level-2 ADAS सह 6 लाखांत मिळणार 'हे' भन्नाट फीचर्स, जाणून घ्या A टू Z माहिती
मारुतीची नवी 'Baleno' लाँच! Level-2 ADAS सह 6 लाखांत मिळणार 'हे' भन्नाट फीचर्स, जाणून घ्या A टू Z माहिती
जगातील सगळ्यात हलकं हेल्मेट! वजन फक्त 1050 ग्रॅम, सुरक्षेच्या बाबतीत मजबूत, शानदार कार्यक्रमात अनावरण
जगातील सगळ्यात हलकं हेल्मेट! वजन फक्त 1050 ग्रॅम, सुरक्षेच्या बाबतीत मजबूत, शानदार कार्यक्रमात अनावरण

व्हिडीओ

Mumbai Gas Leakage : गॅसगळती जीवावर, सुरक्षा वाऱ्यावर, रडारवर महापालिकेचे अधिकारी | Special Report ABP Majha
Urban Naxal News : शहरी नक्षलवादाची कहाणी, शरणागत नक्षलीची जुबानी | Special Report ABP Majha
Maharashtra Dushkal GR : राज्यात 265 तालुक्यांत दुष्काळ जाहीर, सरकारच्या GR मध्ये काय?
Gadchiroli Flood : छत्तीसगडचा पाऊस, गडचिरोलीत हाहाकार Special Report
Manoj Jarange Patil : व्यासपीठ काढलं, मंडप हटवला... पण आंदोलन सुरुच | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Death Certificate New Rules : मृत्यू दाखल्याबाबत मोठा बदल! 1 ऑक्टोबरपासून बदलणार 'हे' कडक नियम; उशिरा नोंदणी करणाऱ्यांना अडचणी
मृत्यू दाखल्याबाबत मोठा बदल! 1 ऑक्टोबरपासून बदलणार 'हे' कडक नियम; उशिरा नोंदणी करणाऱ्यांना अडचणी
Satara Bus Accident : कास पठारावरुन परत येताना यवतेश्वर घाटात सोलापूरच्या बसचा ब्रेक फेल, चालकानं प्रसंगावधान राखल्यानं 32 प्रवाशांचा जीव बचावला
कास पठारावरुन परत येताना यवतेश्वर घाटात बसचा ब्रेक फेल, चालकाच्या दक्षतेमुळं 32 प्रवाशांचा जीव वाचला
Shubman Gill : चौकार मारत शतकाला गवसणी, कॅप्टन शुभमन गिलची दमदार खेळी, विराट कोहलीकडून खास अभिनंदन
चौकार मारत शतकाला गवसणी, कॅप्टन शुभमन गिलची दमदार खेळी, विराट कोहलीकडून खास अभिनंदन
Maharashtra Live blog updates: भाईंदरच्या खाडीकिनारी कृत्रिम तलावातील गणेशमूर्तींचे अवशेष थेट कांदळवनात सोडल्याचा आरोप
Maharashtra Live blog updates: भाईंदरच्या खाडीकिनारी कृत्रिम तलावातील गणेशमूर्तींचे अवशेष थेट कांदळवनात सोडल्याचा आरोप
Diwali Chhath Special Trains : छटपूजा, दिवाळीसाठी मुंबई-पुण्यातून यूपी-बिहारसह विविध ठिकाणी 418 विशेष रेल्वे गाड्या, गोरखपूरला 64 फेऱ्या, असे असेल नियोजन
छटपूजा, दिवाळीसाठी मुंबई-पुण्यातून यूपी-बिहारसह विविध ठिकाणी 418 विशेष रेल्वे गाड्या, गोरखपूरला 64 फेऱ्या, असे असेल नियोजन
Election : अहिल्यानगर जिल्हा बँकेसाठी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक, कट्टर राजकीय विरोधक विखे - थोरात एकत्र,गुप्त बैठकीत  निवडणूक बिनविरोध करण्यासाठी खलबतं
अहिल्यानगर जिल्हा बँकेसाठी कट्टर राजकीय विरोधक विखे - थोरात एकत्र, संगमनेरमध्ये गुप्त बैठकीत खलबतं
नेपाळमध्ये पुन्हा भूस्खलनाचा थरकाप; थायलंडमध्येही महापुराचा कहर, बँकॉकसह 50 जिल्ह्यात आणीबाणी, हजारो कार पाण्यात, रस्त्यांवर साप फिरू लागले
नेपाळमध्ये पुन्हा भूस्खलनाचा थरकाप; थायलंडमध्येही महापुराचा कहर, बँकॉकसह 50 जिल्ह्यात आणीबाणी, हजारो कार पाण्यात, रस्त्यांवर साप फिरू लागले
AC TV Price Hike : ग्राहकांना मोठा धक्का, 1 ऑक्टोबरपासून एसी, टीव्ही आणि वॉशिंग मशीनचे दर वाढणार, 2026 मध्ये तिसऱ्यांदा महागाईचा चटका 
1 ऑक्टोबरपासून AC, TV सह वॉशिंग मशीन महागणार,ग्राहकांना वर्षभरात तिसऱ्यांदा महागाईचा धक्का 
Embed widget