World’s First Solid State Gogoro Battery : तैवानची इलेक्ट्रिक स्कूटर आणि बॅटरी स्वॅपिंग कंपनी 'गोगोरो'ने (Gogoro) इलेक्ट्रिक टू-व्हीलरसाठी (Electric Vehicle) डिझाइन केलेल्या जगातील पहिल्या सॉलिड-स्टेट बॅटरीचा नमुना आणला आहे. नुकताच कंपनीने सॉलिड-स्टेट बॅटरी लिथियम सिरॅमिक स्वॅपेबल बॅटरीच्या नमुन्याचे अनावरण केले आहे. ही बॅटरी (Prototype) तैवानची बॅटरी तंत्रज्ञान कंपनी ProLogium टेक्नॉलॉजीच्या संयोगाने विकसित करण्यात आली आहे. ProLogium टेक्नॉलॉजी जगातील एकमेव सॉलिड-स्टेट बॅटरी उत्पादक देखील आहे.
या बॅटरीची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे ही बॅटरी Gogoro Electric Two Wheeler सोबत अनुरुप (Compatible) करण्यासाठी डिझाइन करण्यात आली आहे. गोगोरोच्या मते, लिथियम-सिरेमिक बॅटरियां, त्यांच्या पारंपारिक लिथियम-आयन समकक्षांच्या तुलनेत, उच्च ऊर्जा घनता निर्माण करते, ज्यामुळे अधिक मोठी रेंज मिळते. ही बॅटरी रिव्हर्स कंपॅटिबिलिटीसह जोडली गेलेली आहे यामुळे तुम्ही केवळ बॅटरी पॅकवर EV ची चांगली रेंज गाठू शकता.
गोगोरो (Gogoro) कंपनीने असेही म्हटले आहे की, ही नवीन बॅटरी त्यांच्या गोगोरोच्या सध्याच्या वाहनांच्या बॅकवर्डला अनुरुप असेल. कंपनीने पुढे सांगितले की, सध्याच्या लिथियम बॅटरीची क्षमता 140 टक्के किंवा त्याहून अधिक वाढवण्यात येईल. लिथियम-आयन बॅटरीच्या तुलनेत, सॉलिड-स्टेट लिथियम सिरेमिक बॅटऱ्या वापरण्यास सुरक्षित आणि अधिक स्थिर आहेत. नवीन सॉलिड-स्टेट बॅटरी अद्याप एक प्रोटोटाईप असला, तरीही गोगोरोने नवीन तंत्रज्ञानासह त्याचे लाइनअप अपग्रेड करण्यास जास्त वेळ लागणार नाही.
भारतात गोगोरो (Gogoro) आणि हिरो मोटोकॉर्प (Hero MotoCorp) कंपनीने गेल्या वर्षी एप्रिलमध्ये संयुक्त उपक्रमाची घोषणा केली. या संयुक्त उपक्रमात हिरो मोटोकॉर्पची बहुसंख्य भागीदारी आहे. या भागीदारीचा उद्देश गोगोरोचे बॅटरी-स्वॅपिंग नेटवर्क आहे. यामुळे भविष्यात हिरो मोटोकॉर्पला फायदा मिळेल. येत्या काळात ही सॉलिड-स्टेट बॅटरी Hero MotoCorp इलेक्ट्रिक टू-व्हीलरचा एक महत्त्वाचा भाग बनू शकते शकते. याचा एक भाग म्हणजे हिरो कंपनी या वर्षी जुलैमध्ये लाँच करणाऱ्या नवीन इलेक्ट्रिक टू व्हिलरकडे पाहता येईल.
Gogoro सध्या 2,300 हून अधिक ठिकाणी 10,000 पेक्षा जास्त बॅटरी स्वॅपिंग GoStations व्यवस्थापित करण्याचा दावा करते. शिवाय तैवानमधील 95 टक्के इलेक्ट्रिक दुचाकी गोगोरोच्या इकोसिस्टमद्वारे कार्यरत आहेत, त्यामुळे त्यांची बॅटरी स्वॅपिंग इकोसिस्टम अधिक स्पष्ट आणि प्रभावीपणे कार्यरत असल्याचाही कंपनीचा दावा आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Electric Vehicle Policy : मोठ्या शहरांमध्ये सार्वजनिक वाहतुकीत 25 टक्के इलेक्ट्रिक वाहनांचं उद्दिष्ट; पाच हजार चार्जिंग स्टेशन्स!
- Anand Mahindra : उद्योगपती आनंद महिंद्रांचं नवं पाऊल; आता सुरु करणार मेडिकल काॅलेज
- Anand Mahindra यांनी शब्द पाळला! सांगलीच्या रॅन्चोला मिनी जिप्सीच्या बदल्यात मिळाली Bolero
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha
Car loan Information:
Calculate Car Loan EMI