EV Sales In Delhi: परिवहन विभागानं (Transport Department) दिलेल्या माहितीनुसार, मार्चमध्ये दिल्लीत (Delhi) विक्री झालेल्या एकूण वाहनांमध्ये इलेक्ट्रिक वाहने जवळपास 15 टक्के आहेत. मार्चमध्ये दिल्लीत 7,926 इलेक्ट्रिक वाहने (EV) विकली गेली, त्यापैकी चार चाकी वाहने 20 टक्के आणि तीन चाकी वाहने 12 टक्के असल्याची माहिती परिवहन विभागानं दिली आहे. गेल्या महिन्यात शहरात एकूण 53,620 वाहनांची नोंदणी झाली होती.
दिल्लीच्या परिवहन विभागाच्या ट्विटर अकाऊंटवर (Transport for Delhi) एक ट्वीट शेअर करण्यात आलं आहे. या ट्वीटमध्ये दिल्लीमधील इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीबाबत माहिती देण्यात आली आहे. यामध्ये लिहिलं आहे, दिल्लीमधील इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीचा हा मार्च 2023 मधील रिपोर्ट- 7,917 इलेक्ट्रिक वाहनांची विक्री झाली. महिन्यात विकल्या गेलेल्या एकूण वाहनांमध्ये पैकी 14.8 टक्के वाहने इलेक्ट्रिक आहेत. हा आकडा भारतातील इतर राज्यांपेक्षा जास्त आहे.
परिवहन विभागानं हे नमूद केले आहे की, 2020 मध्ये आप सरकारने लागू केलेल्या दिल्ली इलेक्ट्रिक वाहन धोरणांतर्गत 1.12 लाख इलेक्ट्रिक वाहनांची विक्री करण्यात आली.
फेब्रुवारीमध्ये, दिल्लीत नोंदणी झालेल्या एकूण 48,728 वाहनांपैकी 5,268 इलेक्ट्रिक वाहने विकली गेली, तर जानेवारीमध्ये रजिस्टर झालेल्या एकूण 59,520 वाहनांपैकी 5,576 वाहनांची विक्री झाली.
दिल्लीत सातत्याने वाढणाऱ्या वाहनांच्या संख्येमुळे प्रदूषणही वाढत होते. त्यानंतर दिल्लीच्या आम आदमी पक्षाच्या सरकारने 2020 मध्ये इलेक्ट्रिक वाहनांसाठी धोरण लागू केले. ज्या अंतर्गत दिल्लीत इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीवर राज्य सरकारकडून सूट देण्यात येत आहे. दिल्ली सरकार डीटीसीच्या ताफ्यात इलेक्ट्रिक बसेसचाही समावेश करत आहे.
दरम्यान, भारतात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी गेल्या काही वर्षात प्रचंड वाढली आहे. आधी अनेक लोक इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्यास टाळत होते. मात्र आता अधिक आधुनिक आणि अधिक रेंजसह येणाऱ्या इलेक्ट्रिक वाहनांना लोकांची मोठी पसंती मिळत आहे. यात इलेक्ट्रिक बजेट कार आणि इलेक्ट्रिक स्कूटरची सर्वाधिक खरेदी होताना बाजारात दिसून येत आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Car loan Information:
Calculate Car Loan EMI