Electric Vehicle Range : भारतातील काही नवीन इलेक्ट्रिक कार (Electric Car) एका चार्जवर 300 किलोमीटरहून अधिक वेगाने जाऊ शकतात. पण, इलेक्ट्रिक कार विकत घेणाऱ्या लोकांमध्ये रेंजची चिंता अजूनही सामान्य आहे. गाडी चालवताना कारची रेंज कमी होण्याची चिंता चिंताजनक असू शकते. कारण कोणीही संपलेल्या बॅटरीसह रस्त्यावर अडकू इच्छित नाही. अशा वेळी, जर तुमच्याकडे इलेक्ट्रिक कार असेल तर या ठिकाणी आम्ही तुमच्यासाठी EV ची रेंज वाढविण्याच्या टिप्स घेऊन आलो आहोत. ज्या तुमच्या नक्कीच उपयोगी येतील.


सुरळीतपणे चालवा कार


फुल एक्सलेटरसह वापरून गाडी चालवल्याने तुमच्या EV ची बॅटरी लवकर संपू शकते. जर तुम्हाला कमी अंतराचा प्रवास करायचा असेल तर अधिक टॉर्क मिळविण्यासाठी तुम्ही अधिक वेग वाढवू शकता. पण, लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी हा पर्याय फॉलो करू नका. 


कारच्या वेगाकडे लक्ष द्या 


जेव्हा शक्य असेल तेव्हा तुमच्या कारचा वेग 60 mph च्या खाली ठेवण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुम्हाला वाढत्या वेगासाठी अधिक दंडही भरावा लगाणार नाही. तसेच, तुमच्या बॅटरीची रेंज देखील वाढेल. इलेक्ट्रिक वाहन उत्पादक कंपन्यांचे म्हणणे आहे की, तुमचा वेग ताशी 16 किलोमीटरने कमी करून तुम्ही 14 टक्के ऊर्जा वाचवू शकता. जर तुमच्या EV मध्ये "Eco" जर मोड असेल तर त्याचा अधिक वापर करा. 


रीजनरेटिव्ह ब्रेकिंग वापरा


जेव्हा शक्य असेल तेव्हा, तुमच्या EV च्या रीजनरेटिव्ह ब्रेकिंग फंक्शनचा लाभ घ्या आणि आवश्यक असेल तेव्हाच ब्रेक वापरा. यामुळे वेग कमी करताना वाहनाच्या बॅटरी आपोआप हळू चार्ज होतील. 


एसी/हीटरचा वापर कमी करा 


ईव्हीचा हीटर आणि एसी चालवल्याने बॅटरी लवकर संपते. यासाठी क्लायमेट कंट्रोल सिस्टमचा कमी वापर करा आणि त्याऐवजी हवेशीर सीट्स आणि हीटेड स्टीयरिंग व्हील वापरा. 


अतिरिक्त सामान काढा 


जर तुम्ही प्रवासाला जात असाल तर तुमच्या कारमध्ये जेवढं लागेल तेवढंच सामान घ्या. अतिरिक्त सामान घेऊन जाऊ नका. कारची रेंज वाढविण्याचा हाही एक सोपा मार्ग आहे. म्हणून, आपल्या कारमध्ये शक्य तितके कमी सामान ठेवा. 


अतिरिक्त उपकरणे ठेवू नका 


तुमच्या EV वर छतावरील रॅक आणि मालवाहू वाहक यांसारख्या बाह्य उपकरणे बसवणे टाळा, कारण अशा वस्तूंमुळे जास्त वेगाने ऊर्जा खर्च करू शकते.


महत्त्वाच्या बातम्या :


Truck AC Cabin Mandatory: 1 ऑक्टोबर 2025 पासून सर्व ट्रकमध्ये AC केबिन अनिवार्य; रस्ते वाहतूक मंत्रालयाकडून नोटिफिकेशन जारी


Car loan Information:

Calculate Car Loan EMI